मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतचा पर्सनल बॉडीगार्ड कुमार हेगडे याच्यावर मुंबईतील एका ब्यूटिशियनला लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. यानंतर बुधवारी कुमार हेगडे यांच्याविरुध्द मुंबईतील डीएन नगर पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला आहे.
आरोपी कुमार हेगडे यांच्या कथित दुष्कर्मांबद्दल स्वत: पीडिता एबीपी न्यूजशी बोलली होती. पण आता तिची मैत्रिण दिव्या कोटियानने एबीपी न्यूजशी बोलताना कुमार हेगडे यांच्याबद्दल बरेच खुलासे केले आहेत.
दिव्याने एबीपी न्यूजला सांगितले की, "कुमार हेगडे हा माझ्या मैत्रिणीबरोबर अनैसर्गिक लैंगिक संबंधही ठेवत होता. शारीरिक संबंध ठेवण्याअगोदर तो नशा करत असे आणि नंतर सेक्स दरम्यान कुमार तिच्याशी अत्यंत आक्रमक वागला होता." दिव्या म्हणाली की तिची पीडित मैत्रिण इतकी निरागस आहे की तिला अनैसर्गिक लैंगिक संबंधांबद्दल फारशी माहिती नव्हती. अशा परिस्थितीत ती त्याला बळी पडत राहिली.
दिव्या पुढे म्हणाली, "कुमार हेगडे याच्याविरोधात पोलिसात तक्रार देण्याऐवजी माझ्या मैत्रिणीला आत्महत्या करायची होती. आपली फसवणूक झाल्याचं समजल्यानंतर तिच्या डोक्यात आत्महत्येचे विचाक येत होते. जेव्हा तिने मला याबद्दल सांगितले तेव्हा मी स्पष्ट केले की चूक करणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे. स्वत:ला अशा प्रकारे शिक्षा देण्याचा विचार करु नको. "
दिव्या कोटियान म्हणाली की, कुमार हेगडे याच्याविरोधात पोलिसांत तक्रार करण्याची बाब तिला समजली आणि अशा परिस्थितीत तिने तिला डीएन नगर पोलिस ठाण्यात नेले.
दिव्याने तिच्या आरोप करणार्या मैत्रिणीचा हवाला देत सांगितले की ते दोघेही एकमेकांना 8-9 वर्षांपासून ओळखत होते. गेल्या वर्षी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवल्यापासून कुमार तिच्या मैत्रीणीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता.
दिव्याने तिच्या पीडित मैत्रिणीचा हवाला देत एबीपी न्यूजला सांगितले की कुमारला फक्त मुलींमध्येच नाही तर मुलांमध्येही रस आहे. तो त्यांच्याबरोबर लैंगिक संबंधही ठेवत असे. दिव्या सांगते, "कुमारने या गोष्टी माझ्या मैत्रिणीला एकदोनदा स्वत: सांगितल्या होत्या, पण, कुमार मस्करी करत असल्याचे तिला वाटले. तिने या गोष्टींकडे लक्ष दिले नाही. मात्र, नंतर मला इतरांकडूनही अशीच माहिती मिळाली.
दिव्या पुढे म्हणाली, "कुमारने लग्नाचे आमिष दाखवून अनेक मुलींशी लैंगिक संबंध ठेवले असून नंतर त्याचा तो स्वभाव बनला होता. इतकेच नाही तर माझ्या मैत्रिणीच्या पैशाखेरीज त्याने इतर अनेक मुलींकडून पैसे घेतले होते. कुमार हेगडेने कंगना रनौतच्या अंगरक्षक असल्याचा फायदा घेत अनेक निरपराध मुलींना आपल्या जाळ्यात ओढलं आहे.
दिव्याचे म्हणणे आहे की कुमार हेगडे आईच्या मृत्यूची खोटी बातमी सांगून कर्नाटकात गेला. मात्र, कॉमन फ्रेंड्सकडून तिला समजले की तो लग्न करण्यासाठी तिथे गेला आहे. दिव्या सांगते की, तेव्हापासून तिची पीडित फ्रेंड सतत कुमार हेगडे याच्याशी फोन व मेसेजद्वारे बोलण्याचा प्रयत्न करीत होती. परंतु, त्यानंतर कुमारचा फोन सतत बंद येत आहे.
दिव्या म्हणाली की कुमारचा फोन बंद होता, मात्र, तिच्या मैत्रिणीला धमकी देणारे कॉल दुसर्याच्या फोनवरून येत आहेत. आम्हाला या संपूर्ण विषयावर कंगना रनौत यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याची इच्छा होती. मात्र, तिच्याकडून आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही किंवा कंगनाने अद्याप याबद्दल काहीही पोस्ट केलेले नाही.