Kangana Ranaut Grandmother Passes Away : बॉलिवूड अभिनेत्री आणि  भाजप खासदार कंगना रणौतच्या आजीचं निधन झालं आहे.  अभिनेत्री कंगना रणौतची आजी इंद्राणी ठाकूर यांचे निधन झालं आहे. त्यांचे वय 100 वर्षांपेक्षा जास्त होतं. आजीच्या निधनामुळे कंगना रणौतसह तिच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कंगनाने सोशल मीडियावर ही दु:खद बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.


अभिनेत्री कंगना रणौतच्या आजीचं निधन


अभिनेत्री कंगना रणौतने इंस्टाग्राम स्टोरीवर तिच्या आजीचे दोन फोटो शेअर करून ही दु:खद बातमी चाहत्यांना दिली आहे. कंगनाने इंस्टा स्टोरीमध्ये लिहिलं आहे, शुक्रवारी रात्री आजीचं निधन झालं. यासोबतच कंगनाने दिवंगत आजीसाठी एक भावनिक पोस्टही लिहिली आहे. अभिनेत्री कंगना रणौत तिच्या आजीच्या खूप जवळ होती आणि अनेकदा ती आजीचे फोटो शेअर करत असे. त्यामुळे आजीच्या निधनानंतर कंगनाच्या चाहत्यांना संवेदना आणि शोक व्यक्त केला आहे.


कंगना रणौतवर कोसळला दु:खाचा डोंगर


अभिनेत्री कंगना राणौतने शनिवारी, 9 नोव्हेंबर रोजी इंस्टाग्रामवर एका इंस्टाग्राम स्टोरीद्वारे तिच्या चाहत्यांसह ही दुःखद बातमी शेअर केली. तिने आजीचे फोटो शेअर केले आणि एक भावनिक पोस्टे लिहिली आहे. कंगनाने पोस्टमध्ये लिहिलंय, 'काल रात्री माझी आजी इंद्राणी ठाकूर यांचं निधन झालं. कुटुंबावर शोककळा पसरली आहे. कृपया त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करा.'


ब्रेन स्ट्रोकनंतर ती बेडवर पडून


कंगनाने आणखी एका स्टोरीमध्ये लिहिलं आहे की, 'काही दिवसांपूर्वी ती तिची खोली साफ करत होती आणि तिला ब्रेन स्ट्रोक आला, त्यानंतर ती बेडवर पडून राहिली, जे तिच्यासाठी खूप वेदनादायक होते. ती फार सुंदर प्रकारे आयुष्य जगली आणि एक प्रेरणा बनली. तुम्ही नेहमी आमच्या डीएनएमध्ये कायम राहाल. मला तुझी नेहमी आठवण येईल.'


'माझी आजी एक अद्भुत स्त्री'


कंगना पुढे म्हणाली, 'माझी आजी एक अद्भुत स्त्री होती, तिला 5 मुले होती. नानाजींकडे मर्यादित संसाधने होती, तरीही त्यांनी आपल्या सर्व मुलांना चांगल्या संस्थांमध्ये चांगले शिक्षण मिळावे याची काळजी घेतली आणि आपल्या विवाहित मुलींनीही नोकरी करावी आणि करिअर करावे असा त्यांचा आग्रह होता. माझी आजी इतकी निरोगी आणि चैतन्यशील होती की, तिचे वय 100 पेक्षा जास्त असूनही ती तिची सर्व कामे स्वतः करायची.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


ऐश्वर्या रायच्या वाढदिवसाला अभिषेक बच्चन गैरहजर, बर्थडे पार्टी टाळण्याचं समोर आलं मोठं कारण