Gurucharan Singh : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. पण गेल्या 15 दिवसांपासून कथानकामुळे नव्हे तर एका वेगळ्याच कारणाने ही मालिका चर्चेत आली आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत रोशन सोढीची भूमिका साकारणारा गुरुचरण सिंह (Gurucharan Singh) गेल्या 15 दिवसांपासून बेपत्ता आहे. गुरुचरणचे कुटुंबीय आणि पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत. गुरुचरणचे चाहतेदेखील नाराज झाले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते आपली नाराजी व्यक्त करत आहेत. तसेच दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) तपासावरही प्रश्न उपस्थित करत आहेत. 


गुरुचरण सिंह बेपत्ता असल्याने त्याचे कुटुंबीय खूप दु:खी आहेत. त्याच्या वडिलांची प्रकृतीदेखील खालावली आहे. दिवसरात्र आपला मुलगा परत यावा यासाठी ते प्रार्थना करत आहेत. ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत गुरुचरणच्या वडिलांनी आपल्या लेकाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. गुरुचरणने वडिलांचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला होता. 


दिल्ली पोलिसांच्या तपासावर चाहत्यांचा सवाल


सोढीचे चाहते दिल्ली पोलिसांवर नाराज आहेत. चाहते म्हणत आहेत,"सलमान खानच्या घराबाहेर फायरिंग करणाऱ्या शूटर्सला पोलिसांनी 24 तासात ताब्यात घेतलं. पण दुसरीकडे 15 दिवसांपासून गायब असलेल्या गुरुचरण सिंहचा चाहत्यांना शोध घेता आलेला नाही". सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते आपली नाराजी व्यक्त केली आहे. 


गुरुचरणचा फोन 24 एप्रिलपासून बंद


गुरुचरण सिंह 22 एप्रिलपासून बेपत्ता आहे. 25 एप्रिलपर्यंत गुरुचरणची काहीही माहिती मिळाली नाही त्यामुळे त्याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी किडनॅपिंग केस अंतर्गत तपास सुरू केला आहे. पण या तपासात अद्याप काहीही समोर आलेलं नाही. काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये गुरुचरण सिंह दिल्लीत पाठीवर बॅग घेऊन दिसत आहे. दिल्लीतील एका एटीएममधून त्याने 7 हजार रुपये काढले आहेत. 24 एप्रिलपर्यंत त्याचा फोन सुरू होता. पण नंतर मात्र त्याचा फोन बंद झाला.


'तारक मेहता...'मुळे घराघरांत पोहोचला गुरुचरण सिंह


'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता गुरुचरण सिंह घराघरांत पोहोचला आहे. या मालिकेत त्याने रोशन सिंह सोढीची भूमिका साकारली होती. या भूमिकेच्या माध्यमातून त्याने घराघरातील प्रेक्षकांना हसवण्याचं काम केलं आहे. मालिकेत नेहमीच तो पार्टी मोडमध्ये दिसून आला आहे. गुरुचरण सिंहने 2020 मध्ये 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेला रामराम केला होता. 


संबंधित बातम्या


TMKOC Gurucharan Singh Missing Case: TMKOC मधील 'सोढी' बेपत्ता प्रकरणी मोठी अपडेट, स्वत: तयार केला प्लान? पोलिसांचे पथक मुंबईत दाखल