Kangana Ranaut On Twinkle Khanna : अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) ही आपल्या बेधडक वक्तव्यामुळे चांगलीच चर्चेत असते. बॉलिवूडमधील कलाकार असो किंवा राजकीय नेते असो, त्यांच्याविरोधात कंगनाने थेट भाष्य केले आहे. कंगनाने आता अभिनेत्री ट्विंकल खन्नासोबतच (Twinkle Khanna) पंगा घेतला आहे. एका व्हिडीओवरून कंगनाने ट्विंकलला सुनावले आहे. या व्हिडीओत ट्विंकल खन्नाने पुरुषांची तुलना पॉलिथीन पिशवीसोबत केली होती.


कंनगा रणौतने इन्स्टाग्राम स्टोरीवर ट्विंकल खन्नाचा जुना व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ट्विंकलने पुरुषांची तुलना पॉलिथीन बॅगेसोबत केली. कंगनाने हे 'नेपो किड' म्हणून तिला सुनावले. 


ट्विंकलवर कंगना भडकली, चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली लोक... 


कंगनाने आपल्या स्टोरीमध्ये म्हटले की, अखेर हे प्रीव्हलेज असलेले लोक समजतात तरी काय? आपल्या पुरुषांना पॉलिथीन बॅग म्हणतात. आपण कूल आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत का? चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या या नेपो किड्सला सोन्याच्या ताटात फिल्मी करिअर देण्यात आले. मात्र, त्यांनाही ही मंडळी न्याय देऊ शकले नाहीत. कमीत कमी  निदान मातृत्वाच्या नि:स्वार्थीपणात त्यांना काही आनंद आणि समाधान मिळाले असते. पण हेही त्यांच्यासाठी शापच ठरला आहे. त्यांना खरोखर काय व्हायचे आहे? हा स्त्रीवाद आहे का?' अशा शब्दांत कंगनाने ट्विंकल खन्नाला सुनावले. 




ट्विंकल खन्नाच्या जुन्या व्हिडीओवरुन वाद


एका जुन्या मुलाखतीत ट्विंकल खन्नाला विचारण्यात आले होते की ती स्त्रीवादी आहे हे तिला कसे समजले? यावर ट्विंकलने मजेशीर उत्तर दिले आहे. आई डिंपल कपाडिया यांच्यामुळेच हे घडल्याचे त्याने सांगितले होते. तिने ट्विंकलला मोठं झाल्यावर शिकवलं की स्त्रियांना पुरुषांची गरज नसते.


ट्विंकलने काय उत्तर दिले?


ट्विंकल म्हणाली, 'आम्ही स्त्रीवाद, समानता किंवा कशावरही बोललो नाही. पण पुरुषाची गरज नाही हे अगदी स्पष्ट होते. तुमच्याकडे एक छान हँडबॅग आहे त्याप्रमाणे माणूस असणे खूप चांगले होईल. पण, जर तुमच्याकडे प्लास्टिकची पिशवी असेल तर ती अजूनही चालेल.या धारणेतून आम्ही वाढलो. बऱ्याच  काळापासून मला असे वाटले की पुरुषांचा काही विशेष उपयोग नाही. 


ट्विंकल सध्या काय करते?


याच मुलाखतीत ट्विंकलने असेही म्हटले होते की, पुरुष महिलांपेक्षा कमजोर असतात. ते स्त्रियांच्या 10-15 वर्षांपूर्वी मरतात. ट्विंकल ही राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची मुलगी आहे, जे त्यांच्या काळातील सुपरस्टार होते. डिंपल अजूनही चित्रपटांमध्ये काम करत आहे. ट्विंकलनेही तिच्या करिअरची सुरुवात चित्रपटांमधून केली. पण बॉक्स ऑफिसवर तिचे चित्रपट फारशी जादू दाखवू शकले नाहीत. अभिनेता अक्षय कुमारसोबत विवाहबद्ध झाल्यानंतर ट्विंकल सिनेइंडस्ट्रीत अभिनेत्री म्हणून फारशी सक्रिय राहिली नाही. सध्या ती स्तंभ लेखन करत असून आणि इंटेरिअर डिझायनर म्हणून कार्यरत आहे.