Kamaal Rashid Khan : अभिनेता आणि चित्रपट समीक्षक  कमाल आर खान (Kamaal Rashid Khan) उर्फ ​​केआरकेला काही दिवसांपूर्वी जामीन मिळाला. चित्रपटात काम देतो असं सांगून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी केआरकेला ताब्यात घेतलं होतं. हे प्रकरण तीन वर्षापूर्वीचं आहे.  कमाल आर खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आता केआरकेचा मुलगा फैसल कमालने नुकतेच ट्विट शेअर केले आहे. काही लोक केआरकेला  मारण्यासाठी त्याचा छळ आहेत, असा दावा फैजलने ट्विटमध्ये केला आहे.


फैजलचं ट्वीट
फैजलनं ट्वीटमध्ये लिहिलं, 'मी केआरकेचा मुलगा फैजल कमाल आहे. माझ्या वडिलांना  मारण्यासाठी मुंबईत काही लोक त्यांना त्रास देत आहेत. मी 23 वर्षांचा आहे आणि लंडनमध्ये राहतो. माझ्या वडिलांना कशी मदत करावी हे मला कळत नाही. मी अभिषेक बच्चन, अभिनेता रितेश देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांना माझ्या वडिलांचे जीव वाचवण्याची विनंती करतो.' 


ट्वीटमध्ये सुशांत सिंह राजपूतचा केला उल्लेख
'माझी बहीण माझ्या वडिलांशिवाय जगू शकत नाही, ते आमचं आयुष्य आहेत. माझ्या वडिलांचा सुशांत सिंह राजपूतप्रमाणे मृत्यू व्हावा अशी आमची इच्छा नाही. मी देशातील जनतेला विनंती करतो की, माझ्या वडिलांच्या आरोग्यासाठी आम्हाला सपोर्ट करा.' असंही फैजलनं ट्वीटमध्ये लिहिलं.










सितम,मुन्ना पांडे बेरोजगार,देशद्रोही, एक व्हिलन यांसारख्या चित्रपटांमध्ये कमाल आर खाननं सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली. यामधील देशद्रोही या चित्रपटाची निर्मिती देखील कमालनं केली होती. हिंदी आणि  भोजपुरी सिनेमांत त्यानं काम केलं आहे.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


KRK Gets Bail : वादग्रस्त ट्वीटमुळे अटकेत असलेल्या कमाल आर खानला जामीन; जाणून घ्या प्रकरण...