Kamaal R Khan : वादग्रस्त वक्तव्य आणि ट्विट्समुळे असणाऱ्या कमाल आर खानला (Kamaal R Khan) आता जामीन मिळाला आहे. चित्रपटात काम देतो असं सांगून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. हे प्रकरण तीन वर्षापूर्वीचं आहे. आता जामिन मिळाला असला तरी तरी केआरकेला तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.
तीन वर्षापूर्वीच्या प्रकरणी कमाल आर खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. केआरकेवर महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे त्याने वकीलांकडे जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. दरम्यान केआरकेला त्याच्या मित्राने अडकवलं असल्याचा युक्तीवाद वकीलांनी केला.
केआरकेला आता जामीन मिळाला असला तरी तो पोलिसांच्या ताब्यात असणार आहे. केआरकेने 2020 साली अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी बाँब' या सिनेमावरून एक वादग्रस्त ट्वीट केलं होता. त्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला.
कमाल आर खान कोण आहे?
सितम,मुन्ना पांडे बेरोजगार,देशद्रोही, एक व्हिलन यांसारख्या चित्रपटांमध्ये कमाल आर खाननं सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली. यामधील देशद्रोही या चित्रपटाची निर्मिती देखील कमालनं केली होती. 2009 मध्ये रिलीज झालेल्या बिग बॉस या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाच्या तिसऱ्या सिझनमध्ये कमाल आर खाननं सहभाग घेतला होता. हिंदी आणि भोजपुरी सिनेमांत त्यानं काम केलं आहे. बॉलिवूडमधील कलाकारांबद्दल अक्षेपार्ह वक्तव्य कमाल करत असतो. त्याच्या ट्विट्सची आणि पोस्टची चर्चा सोशल मीडियावर होत असते. तसेच वेगवेगळ्या बॉलिवूड चित्रपटांचे रिव्ह्यू देखील तो सोशल मीडियावर शेअर करतो.
संबंधित बातम्या