Kalki 2898 AD Bhairava Anthem : प्रभास (Prabhas) आणि दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित कल्की 2898 एडी हा चित्रपट रिलीज होण्यास काही दिवस बाकी आहेत. काही दिवसांपूर्वींच चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ करण्यात आला होता. आजचं कल्कीचं पहिलं गाणं भैरव अँथम (Bhairava Anthem) चाहत्यांच्या भेटीला आलं आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक असल्याने  चित्रपटाबाबत रोज काही ना काही अपडेट येत राहतात. चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या गाण्यात प्रभास आणि दिलजीत दोसांझचा स्वॅग चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.


'भैरव अँथम'च्या शूटिंगवेळीचा BTS Video समोर


आज या चित्रपटाचं पहिलं गाणं भैरव अँथम प्रदर्शित झालं आहे. प्रभासच्या आगामी चित्रपट 'कल्की 2898 एडी'मधील 'भैरव अँथम' गाणाच्या शूटींगदरम्यानचे सेटवरील एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. 'भैरव अँथम' गाणाच्या सेटवरील BTS क्लिप म्हणजे Behind The Scene व्हिडीओमध्ये, प्रभास आणि दिलजीत दोसांझचा याराना पाहायला मिळत आहे. हा म्युझिक व्हिडीओ शूट करण्यासाठी एकत्र आलेल्या दोघांनी बॅकस्टेजला मिठी मारली आणि याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. कल्कि चित्रपटाचं हे पहिलेच गाणे असून, त्याच्या प्रोमोची झलक रविवारी पाहायला मिळाली होती. त्यानंतर आज हे गाणं रिलीज झालं आहे.


प्रभासने दिलजीत दोसांझला मारली मिठी


आता प्रभास आणि दिलजीत दोसांझच्या एका व्हिडीओ क्लिपने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. भैरव अँथम गाण्यात दोघांचा स्वॅग पाहायला मिळत आहे. दरम्यान, भैरव गाण्याचा एक पडद्यामागचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्रभास आणि दिलजीत दोसांझमध्ये जबरदस्त बाँडिंग पाहायला मिळत आहे.


दिलजीतसोबत प्रभास पंजाबी लूकमध्ये 


भैरव अँथममध्ये गाणं दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) आणि दीपक ब्लू (Deepak Blue) यांनी गायलं असून संतोष नारायण यांनी संगीत दिलं आहे. हे गाणं हिंदीसोबत, तेलुगू आणि तमिळ भाषेतही प्रदर्शित करण्यात आलं असून यामध्ये दिलजीतचा पंजाबी टच आहे. या गाण्यामध्ये दिलजीत त्याच्या पंजाबी लूकमध्ये दिसत आहे, तर प्रभासनेही पगडी घातली आहे.


पाहा प्रभास आणि दिलजीतचा व्हायरल व्हिडीओ






महत्त्वाच्या इतर बातम्या :


Bhairava Anthem : कल्कि 2898 एडी चित्रपटाचं पहिलं गाणं भैरवा अँथम प्रदर्शित! प्रभास आणि दिलजीत दोसांझचा याराना, तेलुगू आणि पंजाबीचा स्वॅग