मुंबई : भारतीय सिनेमातील सर्वात महागडं बजेट असलेला सायंस फिक्शन 'कल्कि 2898 एडी' (Kalki 2898 AD) चित्रपट 27 जून रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. प्रभास (Prabhas) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) स्टारर  कल्कि 2898 एडी प्रदर्शित झाल्यावर पहिल्याच दिवसापासून कल्कि 2898 एडी चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धमाका पाहायला मिळत आहे. ॲडवान्स बुकींगमध्येच या चित्रपटाने कोट्यवधींची कमाई केली आहे. याशिवाय पहिल्याच दिवशी या चित्रपटाचे शो हाऊसफुल पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी KGF 2 चित्रपटांसह इतर चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला आहे. 


कल्कि 2898 एडीचा बॉक्स ऑफिसवर धमाका


'कल्की 2898 एडी'ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. या सायन्स फिक्शन फ्युचरिस्टिक चित्रपटाने रिलीज होता पहिल्याच दिवशी दमदार कलेक्शन केलं  आहे. या चित्रपटाच्या कमाईमुळे बॉक्स ऑफिसचा दुष्काळ संपला आहे, असं म्हटलं जात आहे. 'कल्की 2898 एडी' चित्रपटाने पहिल्याच दिवशी आतापर्यंत भारतात 50 कोटींचा गल्ला जमवल्याचं समोर आलं आहे. हा चित्रपट पहिल्याच दिवसात 200 कोटीची कमाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कल्कि चित्रपट चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. देशभरातील चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल झालेले पाहायला मिळत आहे आणि प्रेक्षकांनी या चित्रपटाला उदंड प्रतिसाद दिला आहे.


कल्कि 2898 एडी पहिल्या दिवसाच कलेक्शन


चित्रपटाच्या कमाईचे आकडे प्रसिद्ध करणाऱ्या Sacnilk या वेबसाइटनुसार, Kalki 2898 AD पहिल्या दिवशी जगभरात सुमारे 200 कोटी रुपये कमवू शकतो. कल्की 2898 AD ला भारतात 120 ते 140 कोटी रुपयांची ओपनिंग मिळू शकते. आंध्र प्रदेश आणि तेलंगणासारख्या तेलुगू राज्यांमध्ये या चित्रपटाची कमाई 90-100 कोटी रुपये असू शकते. तसेच, उत्तर भारतात हा चित्रपट सुमारे 20 कोटींची कमाई करू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमध्येही हा चित्रपट 15 कोटींहून अधिक कमाई करू शकतो.


200 कोटींची कमाई केल्यास अनेक विक्रम मोडणार


कल्की 2898 एडी चित्रपट जर 200 कोटींची कमाई करण्यात यशस्वी ठरला तर हा चित्रपट सर्वाधिक ओपनिंग करणाऱ्या चित्रपटांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले. आतापर्यंत पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रम RRR चित्रपटाच्या नावावर आहे. RRR  चित्रपटाने पहिल्या दिवशी 223.5 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर, दुसऱ्या क्रमांकावर प्रभासचा चित्रपट 'बाहुबली 2' चित्रपट आहे. 'बाहुबली 2' चित्रपटाने 214 कोटींची कमाई केली होती.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Kalki 2898 AD चित्रपटाचं बजेट 600 कोटी; एकट्या प्रभासचं मानधन बिग बी, दीपिका आणि इतरांपेक्षा जास्त