Kaleidoscope Netflix : गेल्या काही दिवसांत सत्य घटनेवर आधारित मालिका, सिनेमे आणि वेबसीरिजची निर्मिती करण्यात येत आहे. सत्य घटनांवर आधारित कलाकृती प्रेक्षकांना भावत असल्याने अशाच कलाकृतींची निर्मिती करण्याकडे निर्मात्यांचा कल आहे. आता नेटफ्लिक्सची (Netflix) 'कॅलिडोस्कोप' (Kaleidoscope) ही वेबसीरिज सत्य घटनांवर आधारित आहे का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तर ही सीरिज सत्य घटनांवर आधारित आहे. 


'कॅलिडोस्कोप' या वेबसीरिजच्या कथानकाची निर्मात्यांनी फक्त कल्पना केली होती. पण वास्तवातदेखील अशा गोष्टी घडत आहेत हे त्यांना सीरिज प्रदर्शित झाल्यानंतर कळालं. त्यामुळे ही वेबसीरिज वास्तववादी आहे असे म्हणता येईल. या वेबसीरिजमध्ये प्रेक्षकांना थरार-नाट्य अनुभवायला मिळत आहे.


चोरांच्या गुन्हेगारी वृत्तीवर भाष्य करणारी 'कॅलिडोस्कोप' ही वेबसीरिज आहे. अब्जावधी रुपये चोरण्यासाठी चोर कसा प्रयत्न करतात याचे चित्रण या वेबसीरिजमध्ये करण्यात आले आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पैशाची कशी नासाडी होते हे या सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे. एका वेगळ्या दृष्टीकोनातून प्रेक्षक या सीरिजकडे पाहतो. 


एका विश्वासघाताचे रुपांतर ठार मारण्यापर्यंत कसे होते अशा अनेक भीतीदायक गोष्टी या सीरिजमध्ये दाखवण्यात आल्या आहेत. ही रोमांचकाही वेबसीरिज यूएसमधील काही घडामोडींवर बेतलेली आहे. एक वेगळा विषय असल्याने भारतीय प्रेक्षकांना ही सीरिज आवडत आहे. सध्या ही सीरिज ट्रेडिंगमध्ये आहे. 






'कॅलिडोस्कोप' या वेबसीरिजचे आठ एपिसोड आहेत. ही वेबसीरिज प्रेक्षक नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने या सीरिजच्या पुढच्या भागाची चाहते मागणी करत आहेत. त्यामुळे आता निर्माते लवकरच या सीरिजच्या दुसऱ्या भागाची निर्मिती करतील. 


तगडी स्टारकास्ट असेलली 'कॅलिडोस्कोप'!


'कॅलिडोस्कोप' या वेबसीरिजमध्ये जियानकार्लो एस्पोसिटो (Giancarlo Esposito) आणि पाझ वेगा (Paz Vega) मुख्य भूमिकेत आहेत. तर जय कोर्टनी (Jai Courtney), रुफस सेवेल (Rufus Sewell), टाटी गॅब्रिएल (Tati Gabrielle), पीटर मार्क केंडल (Peter Mark Kendall), रोझलिन एल्बे (Rosaline Elbay), निशा नूर (Niousha Noor) आणि जॉर्डन मेंडोझा (Jordan Mendoza) हे कलाकारदेखील या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


संबंधित बातम्या


OTT Platform : नवाजुद्दीन सिद्दीकीपासून ते 'हे' कलाकार मानले जातात सर्वात घातक; ही आहे OTT प्लॅटफॉर्मवरील खलनायकांची यादी