Urfi Javed: भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उर्फी जावेदवर (Urfi Javed) निशाणा साधला होता. 'एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होत आहेत. तर ही बया अजून विकृती पसरवतीये.' असं ट्वीट चित्रा वाघ यांनी शेअर केलं होतं. उर्फीला बेड्या ठोका, अशी मागणी या ट्वीटच्या माध्यमातून चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे केली. चित्रा वाघ यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. 'उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करा' अशी मागणी चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे केली. आता उर्फीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चित्रा वाघ यांनी केलेल्या या मागणीवर प्रतिक्रिया दिली आहे.
उर्फी जावेदनं शेअर केलं ट्वीट:
उर्फीनं ट्विटरवर शेअर केलेल्या ट्वीटमध्ये लिहिलं, 'माझ्या नवीन वर्षाची सुरुवात एका राजकीय नेत्याच्या पोलीस तक्रारीने झाली! राजकारण्यांकडे काही काम नाहीत का? मला तुरुंगात पाठवता येईल, असे राज्यघटनेत एकही कलम नाही. अश्लीलता, नग्नतेची व्याख्या व्यक्तीनुसार बदलते. माझे स्तन आणि योनी हा भाग झाकलेला असतो, त्यामुळे तुम्ही मला तुरुंगात पाठवू शकत नाही. हे लोक केवळ मीडियाचे लक्ष वेधण्यासाठी हे करत आहेत. चित्रा वाघ, मला तुम्हाला काही कामं सांगायची आहेत, मुंबईमध्ये मानव तस्करी मोठ्या प्रमाणात आहे, त्यासाठी काय करता येईल? याचा विचार करा. ते बेकायदेशीर डान्सबार बंद कसे करायचे? (जे अजूनही बरेच आहेत) याचा देखील विचार करा. मुंबईतील बेकायदेशीर वेश्याव्यवसायाच्या विरोधात काय करता येईल? हे देखील बघा.'
'मी आता तुरुंगात जाण्यास तयार आहे फक्त तुम्ही तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या संपत्तीबाबत उघडपणे सांगा. राजकारणी कुठून आणि कसे पैसे कमावतो? ते जगाला सांगा. तुमच्या पक्षात अनेक पुरुष आहेत. छळवणूक वगैरे प्रकार अनेकदा समोर येतात. त्यासाठी चित्रा वाघ तुम्ही काय करता?' असंही उर्फीनं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं.
उर्फीनं तिच्या दुसऱ्या ट्वीटमध्ये लिहिलं, 'चित्रा वाघ यांना सोडून, सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा'
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: