The Top Villains Of OTT Platform : कोणत्याही चित्रपटात, कथेत, वेब सीरिजमध्ये जर एखादं स्ट्रॉंग कॅरेक्टर असेल तर ते खलनायकाचं असतं. खलनायकाच्या भूमिकेचं वैशिष्ट्य हे असतं की जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत कथा पुढे जात असते. आणि जशी खलनायकाची भूमिका संपते तशी त्या चित्रपटाची कथाही संपते. 'मिस्टर इंडिया' प्रमाणेच 'मोगॅम्बो' मरताच चित्रपट संपतो. चित्रपटांप्रमाणेच ओटीटी प्लॅटफॉर्मवरही खलनायकांची खूप क्रेझ आहे. ओटीटीवरील काही कलाकारांनी खलनायकाच्या भूमिका उत्तम प्रकारे साकारल्या आहेत. यातल्याच काही गाजलेल्या खलनायकांची आम्ही तुम्हाला यादी देणार आहोत.
नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui)
नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या कारकिर्दीत जी भूमिका साकारली त्या भूमिकेचं सोनं केलं. मग ती हिरोची भूमिका असोत किंवा मग खलनायकाची. त्याचप्रमाणे नेटफ्लिक्सवर तरूणाईत सर्वात प्रचलित असणारी वेबसीरिज म्हणजे 'सेक्रेड गेम्स'. या वेब सीरिजमधील माफिया गणेश गायतोंडेची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावली.
दिव्येंदु (Divyenndu)
अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर रिलीज झालेल्या 'मिर्झापूर'ला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळाले. यासोबतच या मालिकेत सर्वाधिक चर्चेत असलेली व्यक्तिरेखा म्हणजे दिव्येंदूने साकारलेल्या सीरिजमधील मुख्य खलनायक 'मुन्ना त्रिपाठी'ची भूमिका. दिव्येंदूने 'मुन्ना त्रिपाठी'ची भूमिका अशा प्रकारे साकारली आहे की ती आजही सर्वांच्या स्मरणात राहिली आहे.
अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee)
'पाताळ लोक सीझन 1'मध्ये अभिषेक बॅनर्जीने साकारलेली 'हाथोडा त्यागी' ही भूमिका विसरता येणार नाही. या मालिकेत न बोलता प्रेक्षकांमध्ये भीती निर्माण करण्यात अभिषेक बॅनर्जी यशस्वी ठरला. तुम्हालाजर ही वेबसीरिज बघायची असेल तर तुम्ही अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर ती पाहू शकता.
समंथा अक्किनेनी (Samantha Akkineni)
ओटीटीवर खलनायकाची भूमिका करण्यात अभिनेत्री सामंथा अक्किनेनीही मागे राहिली नाही. 'द फॅमिली मॅन सीझन 2'मध्ये 'राजी'ची भूमिका साकारून समंथाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ही वेबसीरिज Amazon Prime Video वर पाहता येईल.
महत्त्वाच्या बातम्या :