Kalapini Komkali : विख्यात शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली (Kalapini Komkali) यांना संगीत नाटक पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच प्रसिद्ध सतार वादक नीलाद्री कुमार यांनाही संगीत नाटक पुरस्कार जाहीर झाला आहे. संगीत नाटक अकादमीच्या वतीने 2023 या वर्षासाठी संगीत, नाटक, नृत्य क्षेत्रातील पुरस्कारांची घोषणा केली आहे. एक लाख रुपये आणि ताम्रपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
कलापिनी कोमकली या हिंदूस्तानी शास्त्रीय संगीतातील अलौकिक स्वरतपस्वी पंडित कुमार गंधर्व यांची कन्या आहेत. आपल्याकडे असलेला सुरांचा अलौकिक ठेवा जपतानाच शास्त्रीय संगीतात त्यांनी स्वत:ची गायनशैली घडवली आहे.
पंडित कुमार गंधर्व आणि वसुंधरा कोमकली या अत्यंत विलक्षण, प्रतिभावंत शास्त्रीय संगीत गायक दाम्पत्याची कन्या म्हणून कलापिनी यांच्याकडे पाहिले जाते. मात्र कोणत्याही अपेक्षांचे दडपण न घेता वा आपल्या पूर्वसुरींच्या छायेत अडकून न राहता कलापिनी यांनी शास्त्रीय संगीतात स्वत:ची ओळख निर्माण केली. त्यांच्या या गायनशैलीमुळे आता त्यांना संगीत नाटक पुरस्कार जाहीर झाला आहे.
कोण आहेत कलापिनी कोमकली? (Who is Kalapini Komkali)
कलापिनी कोमकली यांनी कुमार गंधर्व यांच्याकडून गायनाचे धडे गिरवले. तर आईकडून त्यांनी गायकीचं तंत्र शिकलं. शास्त्रीय संगीताच्या अभ्यासात आणि स्वरसाधनेत रमलेल्या कलापिनी आज प्रतिभावंतांच्या पिढीची समर्थ प्रतिनिधी आणि प्रसिध्द शास्त्रीय गायिका म्हणून ओळखल्या जातात.
‘कुमार गंधर्व प्रतिष्ठान’च्या माध्यमातून शास्त्रीय संगीताच्या प्रचार-प्रसारासाठीही त्या कार्यरत आहेत. आई – वडिलांबरोबर त्यांनी अनुभवलेले शास्त्रीय संगीताचे विश्व, त्यांनी जवळून पाहिलेली त्यांची स्वरसाधना, दिग्गज व्यक्तिमत्वांचा लाभलेला सहवास, काळाबरोबर बदलत गेलेले हिंदूस्तानी शास्त्रीय संगीत अशा अनेक गोष्टी कलापिनी कोमकली यांनी अनुभवता आल्या आहेत.
'असा' सुरू झाला कलापिनी कोमकली यांचा संगीतप्रवास
कलापिनी कोमकली शाळेत असताना लताबाई, आशाबाई यांची हिंदी गाणी गुणगुणत असे. त्यावेळी एवढाच त्यांचा गाण्याशी संबंध होता. चित्रपटसंगीतावर माझं त्यांचं फार प्रेम होतं. शाळेत गाण्याच्या स्पर्धा व्हायच्या, त्यातही त्या फिल्मी गाणीच गायच्या. अभ्यास करताना, झोपताना रेडिओ त्यांच्या कानाशी असायचा. शाळेतून घरी आल्यावर आधी रेडिओवर क्रिकेटची कॉमेण्ट्री किंवा सिनेमाची गाणी त्या लावायच्या.
अमीन सयानीची बिनाका गीतमाला त्यांना अतिप्रिय होती. लताबाई, आशाताई, महंमद रफी, किशोर कुमार हे त्यांचे अत्यंत आवडते गायक होते. त्यांची गाणी ऐकताना त्या तल्लीन होत असे. शास्त्रीय संगीत सुरू झालं की मात्र मी त्या आत जाऊन झोपायच्या. हे गाणं नकोच, असं तेव्हा त्यांना वाटायचं. आई गाते, वडील गातात, भाऊ गातो, बाबांचे विद्यार्थी गातात, त्यात आपणसुद्धा कशाला? असा विचार त्या करायच्या. पण घरात कान बंद करून वावरणं शक्य नव्हतं. पुढे त्यांना शास्त्रीय संगीताची गोडी निर्माण झाली.
संबंधित बातम्या