Kangana Ranaut on OTT : कोरोनाकाळात ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मची क्रेझ चांगलीच वाढली. आजही या माध्यमावर कलाकृती पाहणारा मोठा चाहतावर्ग आहे. ओटीटीवर रिलीज होणाऱ्या सिनेमांची (Movies) आणि वेबसीरिजची (Web Series) चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. अशातच बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौतने (Kangana Ranaut) आजच्या घडीला सगळे ओटीटी प्लॅटफॉर्म तोट्यात असल्याचं वक्तव्य केलं आहे. 


गेल्या काही दिवसांत छोट्या बजेटचे सिनेमे ओटीटीवर रिलीज करण्यात येत आहेत. सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहण्यापेक्षा ओटीटीवर सिनेमा पाहायला प्रेक्षकांना जास्त आवडत आहे. दुसरीकडे आता ओटीटी प्लॅटफॉर्म तोट्यात असल्याचं कंगना म्हणाली आहे. 


आजच्या घडीला सगळे ओटीटी प्लॅटफॉर्म तोट्यात : कंगना रनौत


‘टीव्ही 9 भारतवर्ष’ला दिलेल्या मुलाखतीत ओटीटी माध्यमाबद्दल बोलताना कंगना रनौत म्हणाली,"ओटीटी विश्वाची एक वेगळी प्रतिमा तुमच्यासमोर रंगवली गेली आहे. कोरोनाच्या सुरुवातीला ओटीटीचा चांगलाच दबदबा होता. या प्लॅटफॉर्मबद्दल सर्वांनाच एक आशा होती. पण आजच्या घडीला सगळे ओटीटी प्लॅटफॉर्म तोट्यात आले आहेत". 


कंगना रनौत पुढे म्हणाली,"एखादा सिनेमा ब्लॉकबस्टर होतो तेव्हा तो 2 ते 3 कोटी प्रेक्षकांनी पाहिलेला असतो. त्यामुळे थिएटरची चांगली कमाई होते. आजच्या घडीला फेसबुक, रील आणि युट्यूब हे प्लॅटफॉर्म नव्या प्रेक्षकांसोबत जोडले गेले आहेत. पण ओटीटी प्लॅटफॉर्मकडे मात्र नवा प्रेक्षकवर्ग नाही. ओटीटी प्लॅटफॉर्म कोणत्या दिशेने जात आहेत हे मला ठाऊक नाही. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे 'इंग्लिश विंग्लिश','क्वीन' आणि 'पीकू' सारखे छोटो बजेट असणारे सिनेमे सिनेसृष्टीपासून दूर आहेत. 'क्वीन' सारख्या सिनेमालाही आज बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळू शकत नाही. प्रेक्षकांना आता मोफत मनोरंजन हवं आहे. आता बिग बजेट सिनेमांची कमी निर्मिती व्हायला हवी. सिनेव्यवसायाचे सध्या वाईट दिवस सुरू आहेत". 




कंगना रनौत ही हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या सिनेमांची चाहत्यांना प्रतीक्षा असते. पण गेल्या काही दिवसांत तिचे एकापाठोपाठ एक सिनेमे फ्लॉप झाले आहेत.  आता कंगनाच्या 'इमर्जन्सी' सिनेमाच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. सिनेरसिक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.


संबंधित बातम्या


OTT Release This Week : ओटीटी प्रेमींसाठी 'हा' आठवडा असणार खास; जाणून घ्या कोणते सिनेमे अन् वेबसीरिज येणार भेटीला