Bawaal Teaser:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि अभिनेत्री जान्हवी कपूर  (Janhvi Kapoor) यांच्या 'बावल' (Bawaal) या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे.  या चित्रपटाचं दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले असून साजिद नाडियादवाला यांनी निर्मिती केली आहे. 'बावल' या चित्रपटाच्या माध्यमातून वरुण आणि जान्हवी यांची जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. 


वरुण आणि जान्हवी यांच्या 'बावल' या  चित्रपटाच्या टीझरमध्ये इमोशन, ड्रामा आणि रोमान्स दिसत आहे. टीझरच्या बॅकग्राऊंडमध्ये एक सॅड गाणेही ऐकू येत आहे. बावल चित्रपटाच्या टीझरसोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट 21 जुलै रोजी अॅमोझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.


पाहा टीझर






वरुण आणि जान्हवी यांनी काल (6 जुलै) सोशल मीडियावर एक फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिले होते, 'तुम प्यार करने देते तो कितना प्यार करते. बवालचा टीझर उद्या 12 वाजता रिलीज होणार आहे.' वरुण आणि जान्हवी यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्या दोघांची रोमाँटिक केमिस्ट्री नेटकऱ्यांनी दिसली.






 राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'छिछोरे' चित्रपटानंतर नितेश तिवारी आणि साजिद ही जोडी पुन्हा एकदा बवाल या चित्रपटासाठी एकत्र आली आहे. आधी बवाल हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार होता, मात्र आता हा चित्रपट 21 जुलै रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.


ऑक्टोबर,बदलापूर, भेडिया,सुई धागा : मेड इन इंडिया,बद्रीनाथ की दुल्हनिया आणि जुग जुग जिओ या हिट चित्रपटांमध्ये वरुणनं काम केलं आहे. तर जान्हवीनं गुंजन सक्सेना, घोस्ट स्टोरीज, दोस्ताना 2, रूही यांसारख्या चित्रपटांमध्ये जान्हवीनं काम केलं आहे. तिच्या मिली या चित्रपटातील अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. आता जान्हवी आणि वरुण यांची जोडी बवाल या चित्रपटामध्ये पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. बवाल या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Bawaal : वरुण-जान्हवीने 'बवाल'च्या शूटिंगला केली सुरुवात; फोटो शेअर करत दिली माहिती