Tanuja: अभिनेत्री काजोलची (Kajol) आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा (Tanuja) यांची प्रकृती काही दिवसांपूर्वी खालावली होती. त्यानंतर त्यांना मुंबईतील जुहू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून तनुजा यांचे चाहते त्या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी प्रार्थना करत होते. आता तनुजा यांच्या प्रकृतीबाबत  मोठे अपडेट समोर आले आहे.  तनुजा यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असून  त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.


तनुजा यांना मिळाला डिस्चार्ज


पीटीआयच्या रिपोर्टनुसार, एका सूत्राने सांगितले, "तनुजा यांचे हेल्थ पॅरामीटर्स नॉर्मल असल्याने त्यांना काल रात्री उशिरा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे."  ज्येष्ठ  तनुजा यांना वयाशी संबंधित काही समस्यांमुळे मुंबईतील जुहू रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते.


तनुजा यांचे चित्रपट


1960 आणि 1970  दशकातील लोकप्रिय अभिनेत्री तनुजा यांनी हिंदी आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केलं आहे.  "बहारें फिर भी आएंगी", "मेरे जीवन साथी", "जीने की राह" तसेच "दया निया", "तीन भुवनेश्वर" यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी प्रमुख बूमिका साकारली आहे.
1950 मध्ये आलेल्या "हमारी बेटी" या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.


"हमारी बेटी" या चित्रपटामधून तनुजा यांची मोठी बहीण नूतनने देखील आपल्या करिअरला सुरुवात केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन नूतन आणि तनुजा यांच्या आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री शोभना समर्थ  यांनी केलं होतं. 


तनुजा यांनी छोट्या पडद्यावरही काम केले आहे. ती ‘आरंभ’ आणि ‘जुनून’ या टीव्ही शोमध्ये त्यांनी काम केलं. तनुजा यांनी प्राइम व्हिडीओच्या 2022 च्या "मॉडर्न लव्ह: मुंबई" मध्ये प्रमुख भूमिका साकारली.


 तनुजा या बॉलिवूमधील प्रसिद्ध अभिनेत्री काजोल आणि तनिषा मुखर्जी यांच्या आई आहेत. काजोलने तिच्या दमदार अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत एक विशेष स्थान निर्माण केले आहे.  काजोलचा लस्ट स्टोरी-2 हा चित्रपट काही दिवसांपूर्वी ओटीटीवर रिलीज झाला. काजोलच्या त्रिभंगा, सलाम वेंकी या चित्रपटांना देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. काजोलची बहिण  तनिषा ही देखील मनोरंजन विश्वात काम करते.






 


Tanuja Hospitalised: दिग्गज अभिनेत्री तनुजा यांची प्रकृती बिघडली; आयसीयूमध्ये दाखल