Shreyas Talpade : मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. श्रेयस सध्या वेगवेगळ्या कलाकृतींच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. श्रेयस आज मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा अभिनेता असला आणि एका सिनेमासाठी कोट्यवधी रुपयांचं मानधन घेत असला तरी एकेकाळी त्याच्याकडे वडापाव घ्यायलाही पैसे नव्हते. 


वडापावसाठीही पैसे नव्हते...


हृदयविकाराचा झटका येण्याआधी श्रेयस तळपदेने एका मुलाखतीत त्याच्या संघर्षाबद्दल भाष्य केलं आहे. श्रेयस आज श्रीमंत अभिनेता असला तरी एकेकाळी त्याच्याकडे वडापाव विकत घ्यायलाही पैसे नव्हते. शूटिंगसाठी बसने प्रवास करायलाही श्रेयसकडे पैसे नव्हते. मोठा संघर्ष आणि मेहनतीच्या जोरावर श्रेयसने आज स्वत:ला सिद्ध केलं आहे.


'या' सिनेमाच्या माध्यमातून श्रेयसने केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण


श्रेयस तळपदे आज कोट्यवधी रुपयांचा मालक आहे. काही दिवसांपूर्वी त्याने अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' (Pushpa) या सिनेमाच्या माध्यमातून साऊथमध्ये पदार्पण केलं. 'पुष्पा'आधी त्याने 'द लायन किंग'च्या (The Lion King) हिंदी वर्जनच्या माध्यमातून हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमात त्याने हॉलिवूड अभिनेता बिली आयशरला आवाज दिला होता. श्रेयसने नागेश कुकुनूरच्या बहुचर्चित 'इकबाल' या सिनेमाच्या माध्यमातून हिंदी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे. या सिनेमातील त्याच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. त्यानंतर त्याला अनेक सिनेमांसाठी विचारणा झाली.


श्रेयसने मराठी मालिकांच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. 1998 मध्ये त्याने 'वो' ही मालिका केली. या कार्यक्रमात तो मुख्य भूमिकेत होता. त्यानंतर त्याने अनेक मालिकांमध्ये काम केलं. करिअरच्या सुरुवातीला यश मिळत नसल्याने श्रेयसने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला. दरम्यान नागेश कुकनूर एक सिनेमा बनवत असल्याचं श्रेयसला कळलं आणि लगेचच त्याने या सिनेमासाठी ऑडिशन दिली. यात सिनेमासाठी त्याची निवड झाली आणि खऱ्या अर्थाने त्याला ब्रेक मिळाला.


श्रेयसने सुपरहिट सिनेमात आपल्या अभिनयाची झलक दाखवली असली तरी आर्थिक बाजू मात्र त्याची चांगली नव्हती. एका मुलाखतीत श्रेयस म्हणाला होता की,"माझ्याकडे घराचं भाडं भरण्याइतकेही पैसे नव्हते. तसेच वडापाव खायलाही पैसे नव्हते. पण मी हिंमत सोडली नाही आणि मेहनत करत राहिलो. श्रेयस तळपदे आज लग्झरी आयुष्य जगत आहे.


श्रेयस तळपदे कोट्यवधींचा मालक (Shreyas Talpade Net Worth)


सीए नॉलेजच्या रिपोर्टनुसार, श्रेयस तळपदेची नेटवर्थ 37 कोटी रुपयांच्या आसपास आहे. एका सिनेमासाठी तो 2 ते 3 कोटी रुपयांचं मानधन घेतो. अनेक जाहिरातींमधूनही तो चांगली कमाई करतो. मुंबईतील ओशिवारा भागात त्याचं आलिशान घर आहे. मराठी मनोरंजनसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये श्रेयसचा समावेश आहे. मालिकेच्या एका भागासाठी तो 40 ते 50 हजार रुपये आकारतो.


संबंधित बातम्या


Shreyas Talpade Health : "10 मिनिटांसाठी त्याचं हृदय बंद पडलं होतं"; श्रेयस तळपदेच्या प्रकृतीबाबत बॉबी देओलची माहिती