
काही कंपन्यांकडून कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी "कबाली‘ची मोफत तिकिटेही देण्यात आली आहेत.
मुंबईतही अरोरा थिएटरमध्ये सकाळी 5 वाजता रजनीकांतच्या फोटोला दुधाचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पहिला शो सुरु झाला. पुढे काही दिवस अरोरा थिएटरमधील कबालीचे सगळे शो हाऊसफुल्ल असल्याचंही सांगण्यात येत आहे.
कबालीमध्ये रजनीकांतसोबत मराठमोळी राधिका अपटेही मुख्य भूमिकेत आहे.