Kaala Paani Season 2 : 'काला पानी' (Kaala Paani) ही वेबसीरिज काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली असून या सीरिजला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. आता या सीरिजचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. लवकरच 'काला पानी 2' (Kaala Paani 2) ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


'काला पानी' ही सीरिज ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित झाली होती. या सीरिजला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. अंदमानात पसरलेल्या एका आजारावर भाष्य करणारी ही सीरिज होती. आता या बहुचर्चित सीरिजच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.


'काला पानी 2' येणार प्रेक्षकांच्या भेटीला!


'काला पानी 2' या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा समीर सक्सेनाने सांभाळली आहे. या सीरिजमध्ये आशुतोष गोवारीकर, अमेय वाघ, विकास कुमार, सुकांत गोयल आणि मोना सिंह महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ही कोरिअन हॉरर थ्रिलर वेबसीरिज आहे. आता नेटफ्लिक्सने या बहुचर्चित सीरिजच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे. अद्याप या सीरिजची रिलीज डेट समोर आलेली नाही. 


'काला पानी 2'सह 'या' सीरिज होणार प्रदर्शित


स्वीट होम सीझन 2


'स्वीट होम सीझन 2' ही साऊथ कोरियन हॉरर थ्रीलर वेबसीरिज आहे. या सीरिजचा दुसरा सीझन डिसेंबरमध्ये रिलीज होईल. माणूस आणि राक्षस यांच्यातील संघर्ष या सीरिजमध्ये दाखवण्यात आला आहे. 


ग्योनसान्ग क्रीचर


ग्योनसान्ग क्रीचर ही साऊथ कोरियन थ्रिलर वेबसीरिज आहे. 22 डिसेंबरला ही सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज होईल. 1945 चा काळ या सीरिजमध्ये दाखवण्यात आला आहे.


रिबेल मून-पार्ट वन


जॅक स्नायजरचा 'रिबेल मून-पार्ट वन' हा सिनेमा 22 डिसेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होईल. या सिनेमाचं कथाक काल्पनिक ग्रहांवर आधारित आहे. 


द ब्रदर्स सन


द ब्रदर्स सन ही अॅक्शन कॉमेडी सीरिज आहे. या सीरिजमध्ये मिशेल येओह मुख्य भूमिकेत आहे. एका आईची आणि मुलाची गोष्ट या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. 4 जानेवारीला ही सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज होईल.


अवतार-द लास्ट एयरबेंडर


अवतार-द लास्ट एयरबेंडर ही सीरिज 22 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. आशियातील एका काल्पनिक देशाची गोष्ट या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. 


डेमसल


'डेमसल' ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. मिली बॉबी ब्राऊन या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहे.


लिफ्ट


लिफ्ट हा सिनेमा 12 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या सिनेमात केविन हार्ट मुख्य भूमिकेत आहेत. 


संबंधित बातम्या


Kaala Paani Review : 'काला पानी' कशी आहे? वाचा रिव्ह्यू