Jiah Khan suicide case: अभिनेत्री जिया खान (Jiah Khan) मृत्यू प्रकरणात सूरज पांचोलीची  (Sooraj Pancholi) निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. कोर्टानं जियाची आई राबिया खान यांना या निकालाल आव्हान देण्याची मुभा  कायम ठेवली आहे.  या प्रकरणात सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर आता जियाची आई राबिया खान यांनी एका मुलाखतीमध्ये न्यायालयच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.

  


काय म्हणाली जियाची आई?


एनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये जिया खानची आई राबिया खाननं सांगितलं,'जिया खानला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोप फेटाळण्यात आला. या प्रकरणाचा निकाल आज लागला. पण मग माझ्या मुलीचा मृत्यू कशामुळे झाला? हा प्रश्न निर्माण होतो. मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. मी सुरुवातीपासून सांगितलं आहे की, हे प्रकरण हत्येचे आहे. आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत.'






3 जून 2013 रोजी जिया खानने मुंबईतील  तिच्या अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केली. जिया खानच्या घरात सहा पानांची सुसाईड नोट सापडली. या सुसाईड नोटमध्ये जियानं सूरजवर अत्याचार, फसवणूक आणि खोटे बोलणे यासह अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. जिया खानची आई राबिया खान यांनी देखील सूरजवर काही गंभीर आरोप केले होते. 


जियाच्या आईनं लिहिलं होतं पंतप्रधान मोदींना पत्र


2017 मध्ये राबिया यांनी आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिले होते. त्यानंतर सूरज पांचोलीने मुंबई उच्च न्यायालयाला खटला जलदगतीने चालविण्याची विनंती केली होती. 


राबिया खान या न्यायालयात म्हणाल्या होत्या की, 'जियानं मला सांगितले की, सूरज हा तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करायचा'  जियानं वयाच्या 18 व्या वर्षी  राम गोपाल वर्मा यांच्या 'निशब्द' या चित्रपटामधून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले होते.  या चित्रपटात तिनं अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली. 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या  गजनी या चित्रपटात जियानं काम केलं.


इतर महत्त्वाच्या बातम्या:


Jiah Khan: टॉर्चर ते गर्भपात, जिया खाननं सुसाईड नोटमध्ये सूरज पांचोलीवर केले होते गंभीर आरोप; अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर 10 वर्षात काय घडलं?