Ganesh Chaturthi 2023 : लाडक्या गणपती बाप्पाचं आज आगमन (Ganesh Chaturthi 2023) होत आहे. बाप्पाचं आगमन झाल्याने आज सर्वत्र उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. तुमच्या लाडक्या सेलिब्रिटींनीही वाजतगाजत जयघोष करत बाप्पाचं स्वागत (Ganesh Chaturthi Welcomed Ganpati Bappa) केलं आहे.


शिल्ली शेट्टीच्या घरी बाप्पाचं आगमन


बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री बाप्पाचं आगमन करताना दिसत आहे. बाप्पाच्या आगमनादरम्यान अभिनेत्रीसह तिचा पती राज कुंद्रादेखील (Raj Kundra) उपस्थित होता. 






राम चरणने शेअर केला बाप्पाचा फोटो


दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणच्या (Ram Charan) घरीदेखील बाप्पाचं आगमन झालं आहे. अभिनेत्याने आगमनादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तो कुटुंबियांसोबत पूजा करताना दिसत आहे.






अल्लू अर्जुनच्या घरी गणरायाचं आगमन


'पुष्पा' (Pushpa) फेम अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) घरी गपणती बाप्पाचा आगमन झालं आहे. सोशल मीडियावर त्याने बाप्पाचा एक फोटो शेअर केला आहे. अल्लू अर्जुनच्या बाप्पाची मूर्ती खूपच सुंदर आहे. 



स्वप्नील जोशीच्या घरी बाप्पा विराजमान


मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशीच्या (Swapnil Joshi) घरीदेखील मोरया मोरयाचा जागर करत बाप्पा विराजमान झाला आहे. बाप्पा चरणी स्वप्नीलने मनोभावे प्रार्थना केली आहे. 






'सा रे ग म प लिटिल चॅम्प' या कार्यक्रमाच्या सेटवरही गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. 






संबंधित बातम्या


Chinmay Mandlekar : गणेश चतुर्थीला 'वादळवाट' मिळाली, तेव्हापासून दरवर्षी रेकॉर्ड कायम, चिन्मयसाठी बाप्पा का आहे खास?