Atlee On Bollywood Workfront:  अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या चित्रपटाची चर्चा सध्या देशभरात होत आहे.  अॅटली  (Atlee)  दिग्दर्शित 'जवान'   या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. जवान चित्रपटाच्या यशानंतर आता साऊथचा दिग्दर्शक अॅटली (Atlee) हा सलमान खान आणि हृतिक रोशन यांना घेऊन चित्रपट बनवण्याचा विचार करत आहेत.


अॅटलीने शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.  आता एका मुलाखतीमध्ये अॅटलीनं त्याच्या आगामी चित्रपटाविषयी सांगितले आहे.  तो त्याच्या पुढच्या हिंदी प्रोजेक्टसाठी इतर बॉलिवूड कलाकारांशी बोलणी करत आहे का? असा प्रश्न अॅटलीला एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. या प्रश्नाचं अॅटलीनं उत्तर दिलं,  'अनेक सिनेप्रेमींशी मी वेळोवेळी अनेक गोष्टींवर चर्चा करते. माझ्यात आणि सलमान सर (खान) यांच्यात बोलणे झाले आहे, माझ्या आणि हृतिक सर (रोशन) यांच्यात खूप आधी बोलणी झाली आहेत, माझ्यात आणि रणवीर सर (सिंग), रणबीर सर (कपूर) यांच्यात बोलणी झाली आहेत. विजय सरांसोबत (थलपथी)  माझा संवाद झाला आणि अल्लू (अर्जुन) सरांशीही चर्चा झाली. सिनेप्रेमी म्हणून मी एका गोष्टीला चिकटून राहत नाही.' 


 अॅटली म्हणाला, 'आम्ही सर्व विचारांशी जोडले गेलो आहोत, आम्ही एकत्र काम करणार आहोत. एकदा देवाने आशीर्वाद दिला की काहीतरी करून पुढे जाईन असे वाटते. तुम्हाला फक्त देवाचा आशीर्वाद आणि चांगली स्क्रिप्ट हवी असते.'






अॅटलीच्या जवान या चित्रपटामध्ये शाहरुख खानसोबतच नयनतारा विजय सेतुपती, संजीता भट्टाचार्य, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, गिरिजा ओक आणि आलिया कुरेशी रिद्धी डोगरा, सुनील ग्रोवर, मुकेश छाबरा, योगी बाबू आणि एजाज खान  या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.  7 सप्टेंबर रोजी हा चित्रपट रिलीज झाला.  ‘जवान’ हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. 


अॅटलीने आजवर थरार आणि अॅक्शन असलेले अनेक सिनेमे बनवले आहेत. आता त्याच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


संबंधित बातम्या:


Atlee Kumar : ज्याला रंगावरून लोकांनी हिणवलं... त्यानेच बॉक्स ऑफिस गाजवलं; जाणून घ्या 'जवान'चा दिग्दर्शक ॲटली कुमारबद्दल...