PM Modi Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा आज (17 सप्टेंबर) 73 वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्ताने देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. कंगना राणौत, अनुपम खेर, परेश रावल, टायगर श्रॉफ यांसारख्या अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राजकुमार रावची पोस्ट
अभिनेता राजकुमार रावनं पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्याने या फोटोसा कॅप्शन दिलं, नरेंद्र मोदीजी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि G20 च्या यशासाठी खूप खूप अभिनंदन. देव तुम्हाला दीर्घायुष्य आणि सर्व सुख देवो. असेच तुम्ही आम्हा सर्वांना प्रेरणा देत रहा. जय हिंद.'
अनुपम खेर यांनी पोस्टमध्ये लिहिलं, 'आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! देव तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य देवो.तुम्ही पुढील अनेक वर्षे अशाच समर्पणाने आणि कठोर परिश्रमाने आपल्या भारताचे नेतृत्व करत राहा. गेल्या 9 वर्षांत तुम्ही देशाला जे स्थान मिळवून दिले त्याबद्दल जगाच्या कानाकोपऱ्यातील सर्व भारतीयांना अभिमान वाटतो. तुमची जगण्याची शैली खूपच प्रेरणादायी आहे. माझी आई तुम्हाला साधूजी म्हणते, ती देखील तुम्हाला आशीर्वाद देत आहे.'
कंगना रनौतची पोस्ट
कंगना रनौतनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, 'जगातील सर्वात प्रेमळ नेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांनी आपल्या कठोर परिश्रमाने आणि दृढनिश्चयाने सक्षमीकरणाच्या शिखरांना स्पर्श केला आणि ते नव्या भारताचे शिल्पकार बनले. भारतातील जनतेसाठी तुम्ही केवळ पंतप्रधान नसून, तुमचे नाव प्रभू रामाप्रमाणे राष्ट्राच्या अंतरात्म्यामध्ये कोरले गेले आहे. मी तुम्हाला दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो.'
टायगर श्रॉफ,तुषार कपूर,परेश रावल यांनी देखील खास पोस्ट शेअर करुन नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :