Top 10 Hindi Net Of All Time: अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) चित्रपटांनी 2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. शाहरुख हा बॉक्स ऑफिसचा 'बादशाह' झाला आहे. कारण आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांच्या यादीत शाहरुखच्या 2 चित्रपटांचा समावेश आहे.  शाहरुखच्या जवान चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जवळपास 525.50  कोटींची कमाई केली आहे. तर सनी देओलच्या (Sunny Deol) गदर 2  (Gadar 2) या चित्रपटानं 524.80 कोटींची कमाई केली आहे. जाणून घेऊयात आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी टॉप 10 चित्रपटांची यादी...


हे आहेत सर्वाधित कमाई करणारे टॉप-10 चित्रपट-


1. जवान: 525.50 Cr
2. गदर 2: 524.80 Cr
3. पठाण: 524.53 Cr
4. बाहुबली 2: 510.99 Cr
5. केजीएफ 2: 435.33 Cr
6. दंगल: 374.43 Cr
7. संजू: 342.57 cr
8. पीके: 340.80 Cr
9. टायगर जिंदा है: 339.16 Cr
10. बजरंगी भाईजान: 320.34 Cr


सर्वाधित कमाई करणाऱ्या टॉप-10 चित्रपटांच्या  यादीत शाहरुख खानचे 2, आमिर खानचे 2, सलमान खानचे 2, सनी देओलचे 1, प्रभासचे 1, यशचे 1 आणि रणबीर कपूरचा एक चित्रपट आहे.


शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट जानेवारी महिन्यात रिलीज झाला. या चित्रपटानं वर्षाची सुरुवात दणक्यात केली. त्यानंतर गदर ऑगस्ट महिन्यात सनीचा गदर 2 चित्रपट रिलीज झाला. 2001 मध्ये रिलीज झालेल्या गदर: एक प्रेम कथा या चित्रपटाप्रमाणेच गदर 2 देखील हिट ठरला त्यानंतर शाहरुखचा जवान चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटातील डायलॉग्स आणि गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 


आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटाच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असणारा जवान हा चित्रपट अॅटलीनं दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात शाहरुखसोबतच  विजय सेतुपती, नयनतारा, प्रियामणी, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा यांनी प्रमुख भूमिका साकारली.






या चित्रपटांचा होणार यादीत समावेश?


यावर्षी  चार बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.   टायगर 3, अॅनिमल, डंकी आणि सालार या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. आता या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते का? तसेच  सर्वाधित कमाई करणाऱ्या टॉप-10 चित्रपटांच्या  यादीत या चित्रपटांचा समावेश होणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Box Office Collection : 'बाहुबली 2' ते 'जवान'; भारतीय सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर केली 1000 कोटींपेक्षा अधिक कमाई