Bollywood Movies 1000 Crore Club : भारतात विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या सिनेमांची (Movies) निर्मिती करण्यात आली आहे. पण त्यातील काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी झाले. तर काही सिनेमे मात्र सुपरफ्लॉप झाले. दुसरीकडे काही सिनेमे बॉक्स ऑफिस गाजवण्यात कमी पडले असले तरी प्रेक्षकांच्या मात्र पसंतीस उतरले. 'बाहुबली 2' (Bahubali 2),'आरआरआर' (RRR) ते 'जवान' (Jawan) पर्यंत अनेक सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.
बाहुबली 2 (Baahubali 2)
'बाहुबली 2' हा प्रभासच्या करिअरमधला सुपरहिट सिनेमा आहे. एसएस राजामौलींनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीसह हिंदीतही या सिनेमाने चांगली समाई केली. या सिनेमाच्या माध्यमातून प्रभास 'पॅन इंडिया'
स्टार झाला. 'बाहुबली 2' या सिनेमाची चाहत्यांमध्ये खूप क्रेझ होती. रिलीजच्या दहा दिवसांत या सिनेमाने 1000 कोटींपेक्षा अधिक कमाई केली.
आरआरआर (RRR)
एसएस राजामौली दिग्दर्शित 'आरआरआर' (RRR) या सिनेमा काही दिवसांपूर्वी चांगलाच गाजला. या सिनेमात राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर मुख्य भूमिकेत आह भारतासह जगभरात या सिनेमाने चांगलीच कमाई केली. या सिनेमाला ऑस्करदेखील मिळालं. रिलीजच्या 16 दिवसांत या सिनेमाने 1000 कोटींचा गल्ला जमवला.
केजीएफ 2 (KGF 2)
प्रशांत नील दिग्दर्शित 'केजीएफ 2' (KGF 2) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. हिंदी पट्ट्यात या सिनेमाला चांगलच यश मिळालं. रिलीजच्या 16 दिवसांत या सिनेमाने 1200 कोटींची कमाई केली आहे.
'जवान' (Jawan)
शाहरुख खान (Shah Rukh Khan) स्टारर 'जवान' (Jawan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे. 'जवान' हा शाहरुखचा या वर्षातला दुसरा सिनेमा आहे ज्याने बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींची कमाई केली आहे. आता हा सिनेमा नक्की किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
'पठाण' (Pathaan)
'पठाण' या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुखने चार वर्षांनी रुपेरी पड्यावर पदार्पण केलं. या सिनेमात किंग खानचा अॅक्शन मोड पाहायला मिळाला आहे. रिलीजच्या 27 दिवसांत या सिनेमाने भारतात 500 कोटी आणि 1000 कोटींचा गल्ला जमवला आहे.
दंगल (Dangal)
आमिर खानच्या करिअरमधला 'दंगल' हा सुपरहिट सिनेमा आहे. या सिनेमातील आमिरच्या कामाचं खूप कौतुक झालं. नितेश तिवारी यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'दंगल' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलच कलेक्शन जमवलं. या सिनेमाने 154 दिवसांत बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींपेक्षा अधिक कमाई केली.
संबंधित बातम्या