Javed Akhtar : लोकप्रिय गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) सध्या चर्चेत आहेत. गीतकार जावेद अख्तर यांना कोर्टाकडून समन्स पाठवण्यात आलं आहे. कंगना रनौतनं (Kangana Ranaut) केलेल्या तक्रारी प्रकरणी 5 ऑगस्टला सुनावणीसाठी कोर्टात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. खंडणी आणि महिलेचं चारित्र्यहनन केल्याचा आरोप कंगनाने जावेद अख्तरांवर केला आहे.
जावेद अख्तर यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 506 (गुन्हेगारी धमकी) आणि 509 (महिलेचा अपमान) अंतर्गत बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौतच्या तक्रारीवरुन समन्स बजावण्यात आले आहे. त्यामुळे पाच ऑगस्टला जावेद अख्तर यांना अंधेरी न्यायालयात हजर राहणे आवश्यक आहे.
नेमकं प्रकरण काय?
2021 मध्ये एका मुलाखतीनंतर जावेद अख्तर यांनी बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौत विरोधात बदनामीची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर अभिनेत्रीनेही त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या मुलाखतीत कंगनाने अपशब्द वापरल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तसेच 2016 मध्ये हृतिक रोशनची माफी मागण्यासाठी अख्तर यांनी तिच्यावर दबाव आणला होता. दरम्यान कंगना रनौत आणि हृतिक रोशनचा वाद जगजाहीर झाला. आता कंगनाच्या तक्रारीची दखल घेत जावेद अख्तर यांना कोर्टाकडून समन्स पाठवण्यात आलं आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनानं (Kangana Ranaut) जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्या विरोधात काही आक्षेपार्ह विधानं केली होती. त्याला कंगनाची बहिणी रंगोली चंदेलनही दुजोरा देत समाजमाध्यमांवर याबाबत कंगनाच्या समर्थनार्थ काही पोस्ट केल्या होत्या. मात्र, या प्रकरणात काहीही तथ्य नसून यातनं आपली नाहक बदनामी होत आहे, असा दावा करत कंगनाविरोधात जावेद अख्तर यांनी कायदेशीर मार्ग स्वीकारत फौजदारी मानहानीचा खटला दाखल आहे.
मार्च 2021 पासून या खटल्याला गैरहजर राहण्यासाठी कंगनानं कोणत्या ना कोणत्या कारणासाठी सतत सूट मागितली होती. न्यायालयानं वॉरंट बजावल्यानंतर अखेर 20 सप्टेंबर 2021 रोजी कंगना न्यायालयात हजर राहिली होती. मात्र त्यानंतर कंगनानं अंधेरी दंडाधिकारी न्यायालयातील या मानहानीच्या खटल्यादरम्यान हजर राहण्यापासून कायमची सूट देण्याची विनंती करणारा अर्ज दाखल केला होता. कंगना एक सेलिब्रिटी असली तरी न्यायालयासमोर आरोपीच आहे, असं न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केलं होतं. कंगना रनौत (kangana Ranaut) प्रकरणी जावेद अख्तर (Javed Akhtar) यांना आता येत्या पाच ऑगस्टला न्यायलयात (Court) हजर राहावं लागणार आहे.
संबंधित बातम्या