Javed Akhtar : जावेद अख्तर यांनी केली आरएसएसची तालिबानशी तुलना, 20 एप्रिलला सुनावणी
लोकप्रिय लेखक, गीतकार आणि कवी जावेद अख्तर सध्या चर्चेत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या काही महिन्यांपूर्वी जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) तुलना तालिबानशी केली होती.
त्यानंतर याप्रकरणी मुलुंड न्यायालयात जावेद अख्तर यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला.
आज यावर सुनावणी होणार होती. पण अख्तर न्यायालयात येऊ न शकल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
जावेद अख्तर आजारी असल्यामुळे न्यायालयात येऊ शकले नाहीत.
त्यामुळे आता 20 एप्रिल 2023 रोजी पुढील सुनावणी घेण्यात येणार आहे.
20 एप्रिलला जावेद अख्तर यांना न्यायालयात उपस्थित राहावे लागणार आहे.
जर 20 एप्रिललादेखील जावेद अख्तर न्यायालयात हजर राहिले नाहीत तर त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केली जाण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे लंडन SOAS विद्यापीठाकडून जावेद अख्तर यांना डॉक्टरेट पदवी देण्यात येणार आहे.
कवी, गीतकार, पटकथा लेखक या क्षेत्रांमधील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे.