Janhvi Kapoor With Shikhar Pahariya: अभिनेत्री  जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही तिच्या चित्रपटांमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. जान्हवी ही शिखर पहाडियाला  (Shikhar Pahariya)  डेट करत आहे, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे. नुकतीच जान्हवी ही शिखरसोबत स्पॉट झाली. शिखर आणि जान्हवी यांच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये ते दोघे एकाच गाडीमध्ये प्रवास करताना दिसत आहेत. जान्हवी आणि शिखर हे अर्जुन कपूरच्या (Arjun Kapoor) घरी जाताना दिसले. 


व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की,  शिखर आणि जान्हवी या दोघांनीही ट्वीनिंग केलं आहे. दोघेही व्हाईट आऊटफिट्समध्ये दिसत आहेत. शिखर आणि जान्हवी हे अर्जुन कपूरच्या  घरी जाताना दिसले. त्यामुळे आता या दोघांच्या डेटिंगची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.


कोण आहे शिखर पहाडिया?


शिखर पहाडिया हा माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. तो स्मृती शिंदे आणि संजय पहाडिया यांचा मुलगा आहे. अनेक वेळा शिखर आणि जान्हवी यांना एकत्र स्पॉट केलं जातं. त्यामुळे हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.


पाहा व्हिडीओ:






जान्हवीचे आगामी चित्रपट


गुंजन सक्सेना, घोस्ट स्टोरीज, रूही यांसारख्या चित्रपटांमध्ये जान्हवीनं काम केलं आहे. तिचा बवाल हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.बवाल हा चित्रपट 21 जुलै रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केलं आहे. साजिद नाडियादवाला यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. बवाल या चित्रपटात जान्हवीसोबतच वरुण धवन देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. जान्हवीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 






वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Janhvi Kapoor: वयाच्या 26व्या वर्षी कोट्यवधींची मालकीण; कधी चित्रपटांमुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते जान्हवी कपूर