Hemant Dhome Tweet On Jalna Maratha Andolan : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषणास बसलेल्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. जालना (Jalna) येथील अंतरवाली सराटी येथे हा प्रकार घडला. राज्यभर या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटीदेखील या घटनेवर प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेता हेमंत ढोमेने (Hemant Dhome) ट्वीट करत आपला संताप व्यक्त केला आहे. 


हेमंत ढोमेने ट्वीट काय केलं? (Hemant Dhome Tweet)


अभिनेते हेमंत ढोमे यांनी ट्वीट केलं आहे,"जालन्यात शांततापूर्ण मार्गाने चालणाऱ्या आंदोलकांवर क्रूर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारी यंत्रणेचा तीव्र निषेध! दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई व्हायला हवी.. आपल्या महाराष्ट्रात पुन्हा शांतता प्रस्थापित व्हावी...राजकारणासाठी हे सारं चिघळता कामा नये". 






हेमंत ढोमेच्या ट्वीटवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया


हेमंत ढोमेच्या या ट्वीटवर दादा राजकीय पोळ्या भाजून घेण्यासाठी चाललेला खटाटोप आहे, सामान्याचा आवाज उचलणारे मोजकेच त्यातला तू एक, हेमंत भाऊला लोकसभेचं तिकीट द्यायला हवं..हा माणूस दरवेळी मनाला भावतो, बाकीचे कलाकार फक्त पोटार्थी आहेत...संवेदनशील नसलेले, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 


हेमंत ढोमे हा सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच अॅक्टिव्ह असतो. मनोरंजनसृष्टीतील वेगवेगळ्या गोष्टींसह समाजातील विविध घडामोडींवर हेमंत ढोमे ट्वीट करत आपलं मत मांडत असतो. आता हेमंतने मराठी आरक्षणासाठी जालण्यात झालेल्या लाठीचार्जावर भाष्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) फेम अश्विनी महांगडेनेदेखील (Ashvini Mahangade) याप्रकरणावर भाष्य केलं आहे. तिने इन्सा स्टोरी शेअर करत लिहिलं आहे,"मराठा आरक्षण आणि लाठचार्ज...का? कशासाठी??". 



नेमकं प्रकरण काय? 


जालन्यातील अंतरवाली (Jalna Maratha Andolan) सराटी येथे 29 ऑगस्टपासन मराठी मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह 10 जण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले होते. दरम्यान पोलीस आणि वाद यांच्यात वाद निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने सुरू झाली. 


संबंधित बातम्या


Jalna Update : जालन्यात सोमवारपासून 17 सप्टेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश; गोपालकाला, मुक्तीसंग्राम मिरवणूक काढण्यावर निर्बंध