Kareena Kapoor : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) सध्या ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी नेटकरी करत होते. बॉयकॉट ट्रेंडमुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई करु शकला नाही. करीनानं नुकताच मुंबईत एका कार लॉन्च इव्हेंटमध्ये सहभाग घेतला. या इव्हेंटमध्ये करीनानं रॅम्प वॉक केला होता. करीनाच्या या रॅम्प वॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी करीनाला ट्रोल केलं आहे.
करीनाला केलं ट्रोल
करीनाच्या व्हायरल व्हिडीओमध्ये ती ग्रेसफुली वॉक करताना आणि तिचा आऊटफिट फ्लॉन्ट करत वॉक करताना दिसत आहे. या व्हिडीओला कमेंट करुन करीनानं केलेल्या कारच्या जाहिरातीवर बहिष्कार टाकण्याची मागणी नेटरकरी करत आहेत.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
मर्सिडीज या कारच्या इव्हेंटमध्ये करीनानं रॅम्प वॉक केला. करीनानं केलेल्या वॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आता या व्हिडीओला कमेंट करुन नेटकऱ्यांनी करीनाला ट्रोल केलं आहे. व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'आता मर्सिडीजवर बहिष्कार टाका. बॉयकॉट मर्सिडीज' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'फक्त चित्रपट नाही तर हिच्या जाहिराती देखील बॉयकॉट करा'
पाहा व्हिडीओ:
लाल सिंह चड्ढाला केलं बॉयकॉट
आमिर खान आणि करीनाचा लाला सिंह चड्ढा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटामध्ये करीना आणि आमिरसोबतच नागा चैतन्य, मानव विज,मोना सिंह या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली. लाल सिंह चड्ढा हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित झाला. आमिर खान प्रोडक्शन्स, किरण राव, वायकॉम 18 स्टडियोज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आमिर आणि करीनाच्या काही जुन्या वक्तव्यांमुळे या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी नेटकऱ्यांनी केली.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: