मगधीरा…बाहुबलीकार एस एस राजामौली यांचा हा सिनेमा. आठ वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या या सिनेमाला प्रचंड लोकप्रियता लाभली. कमाईच्या बाबतीत बोलायचं झालं तर या सिनेमाने रचलेला विक्रम मोडायला पाच वर्ष लागली.
लवकरच येऊ घातलेला 'राबता' याच 'मगधीरा'चं हिंदी व्हर्जन असल्याचा सूर सोशल मीडियावर उमटत आहे. खरं काय ते राबता रिलीज झाल्यावर कळेलच पण राबताचा ट्रेलर पाहिला तर या चर्चेत तथ्य असल्याचंही जाणवतं.
300 वर्षांपूर्वी आणि 300 वर्षानंतर हा दोन्ही सिनेमातला समान धागा आहे. दोन्हा सिनेमातले नायक, नायिका एवढंच नव्हे तर खलनायकही समान ट्रॅकवर जाणारे दिसत आहेत. अर्थात आता फक्त ट्रेलर रिलीज झालाय, खरं चित्र 'राबता' प्रदर्शित झाल्यावर स्पष्ट होईल.
पण खरा प्रश्न असा आहे की राजामौलींचा 'मगधीरा' तरी ओरिजनल होता का?
2005 मध्ये आलेला जॅकी चॅनचा 'मिथ' सिनेमा तुम्हाला आठवतोय का? मल्लिका शेरावतमुळे या सिनेमाची बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चा झाली होती.
'मगधीरा'ची एकंदर गोष्ट आणि त्याची मांडणी या 'मिथ' सिनेमाच्या जवळ जाणारी होती.
थोडक्यात फिल्मी दुनियेत नवीन प्रयोग करण्यापेक्षा यशस्वी सिनेमांचा फॉर्म्युला रिपीट करण्याची स्पर्धा लागली आहे. पण शेवटी हा सुद्धा एक प्रयोगच आहे.
राबता ट्रेलर
मगधीरा ट्रेलर