मुंबई : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर अनेक वेळा त्यांच्या ट्वीट्समुळे वादाच्या भोवऱ्यात अडकत असतात. यावेळी पुन्हा एकदा ऋषी कपूर यांनी चुकीचं ट्वीट करत स्वतःचं हसं करुन घेतलं आहे. प्रख्यात हॉलिवूड अभिनेते एडी मर्फींना जिवंतपणीच श्रद्धांजली अर्पण केली.

एडी मर्फी यांचा फोटो ट्वीट करुन ऋषी कपूर यांनी 'RIP. एक उत्तम अभिनेता. तुम्ही कायम स्मरणात राहाल.' असं लिहिलं. हा फोटो पाहताच ट्विटराईट्सनी ऋषी कपूरची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली.



एडी मर्फी यांचे बंधू असलेले अभिनेते चार्ली मर्फी यांचं 12 एप्रिलला निधन झालं. ल्युकेमियाशी झुंज अपयशी ठरल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला.



ऋषी कपूर यांना हा घोळ लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ ट्वीट डिलीट करुन माफी मागितली. मुळात ऋषी कपूर यांना चार्ली यांनाच श्रद्धांजली वाहायची होती आणि फोटो टाकताना त्यांची गल्लत झाली, की एडी मर्फी यांचं निधन झाल्याचा त्यांचा समज झाला, हा प्रश्न कायम आहे.