Jaya Bachchan: अभिनेता आमिर खानची लेक आयरा खान (Ira Khan) आणि नुपूर शिखरे (Nupur Shikhare) यांचे उदयपूरमध्ये ग्रँड वेडिंग झाले. आमिर आणि नुपूर यांनी ख्रिश्चन पद्धतीनं लग्न केलं. त्यानंतर काल( 13 जानेवारी) मुंबईत आयरा-नुपूरची रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती. या ग्रँड रिसेप्शनला बॉलिवूडपासून ते राजकीय जगतातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. या रिसेप्शन पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामधील एका व्हिडीओमध्ये जया बच्चन (Jaya Bachchan) या पापाराझीवर भडकलेल्या दिसत आहेत.
आधी पापाराझीवर भडकल्या नंतर स्माईल दिली
आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या रिसेप्शन सोहळ्यातील सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये जया बच्चन, श्वेता बच्चन आणि सोनाली बेंद्रे या पापाराझीसमोर फोटोसाठी पोज देताना दिसल्या. यावेळी जया बच्चन पापाराझीवर भडकलेल्या दिसल्या. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, जया बच्चन या पापाराझीला म्हणतात, "क्या आप इधर अँगल हमको सिखा रहे हैं?" त्यानंतर त्या फोटोग्राफर्सकडे बघून स्माईल करतात.
पाहा व्हिडीओ:
आयराच्या रिसेप्शन सोहळ्यात अनेक बॉलिवूड स्टार्सनं हजेरी लावली. सलमान खाननं देखील हा सोहळ्याला हजेरी लावून आयरा आणि नुपूर यांना शुभेच्छा दिल्या. तसेच शाहरुख खानही पत्नी गौरी खानसोबत पार्टीत पोहोचला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि मुकेश अंबानी यांनी देखील रिसेप्शनला हजेरी लावून नुपूर आणि आयरा या जोडप्याला आशीर्वाद दिले. तसेच सोनाली बेंद्रे, हेमा मालिनी,रेखा, अनिल कपूर, धर्मेंद्र या सेलिब्रिटींनी देखील आयरा आणि नुपूर यांच्या रिसेप्शनला हजेरी लावली.
आयरा खान आणि नुपूर शिखरे हे गेली काही वर्षे एकमेकांना डेट करत होते. 3 जानेवारी रोजी आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी मुंबईच्या ताज लँड्स एंड येथे रजिस्टर मॅरेज केले. त्यानंतर त्यांनी उदयपूरमध्ये ख्रिश्चन पद्धतीनं लग्न केलं. त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: