Ira Khan And Nupur Shikhare Wedding Reception: अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) मुलगी आयरा खान (Ira khan) आणि नुपूर शिखरे (Nupur Shikhare ) यांचे ग्रँड वेडिंग रिसेप्शन काल पार पडले. या रिसेप्शन सोहळ्याला अनेक कलाकारांनी तसेच विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली. आयरा आणि नुपूरच्या वेडिंग रिसेप्शन सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामधील परशा आणि आर्ची म्हणजेच आकाश ठोसर (Akash Thosar) आणि रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) यांच्या एका व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडीओची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.


आर्ची आणि परशानं वेधलं नेटकऱ्यांचे लक्ष 


सैराट या चित्रपटामधील आर्ची आणि परशा या जोडीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटात आकाश ठोसरनं परशा तर रिंकू राजगुरुनं आर्ची ही भूमिका साकारली. सैराट चित्रपटानंतर या दोघांना पुन्हा एकत्र रुपरे पडद्यावर पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. अशातच आकाश आणि रिंकू यांनी नुपूर आणि आयरा यांच्या वेडिंग रिसेप्शनला हजेरी लावली. या दोघांनी एकत्र पापाराझीला फोटोसाठी पोज दिल्या. आयरा आणि नुपूरच्या वेडिंग रिसेप्शन सोहळ्यातील रिंकू आणि आकाशच्या  व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. 


नेटकऱ्यांच्या कमेंट्स


आयरा आणि नुपूरच्या वेडिंग रिसेप्शन सोहळ्यातील आकाश आणि रिंकूच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "मला हे दोघे खूप आवडतात." तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "सैराट जोडी"






 'सैराट' या सिनेमामुळे रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर रातोरात सुपरस्टार झाले. हा चित्रपट  2016 मध्ये रिलीज झाला पण आजही प्रेक्षक आवडीनं हा चित्रपट बघतात. या चित्रपटामधील गाण्यांना आणि चित्रपटामधील रिंकू आणि आकाशच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. काही महिन्यांपूर्वी आकाशचा घर बंदूक बिरयानी हा चित्रपट रिलीज झाला होता तर रिंकू ही झिम्मा-2 या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला आली.  आता प्रेक्षक रिंकू आणि आकाशच्या आगामी चित्रपटांची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Rinku Rajguru Real Name: 'तुझ्या बॉयफ्रेंडचं नाव काय आहे?', 'तुझं खरं नाव काय?'; नेटकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना रिंकूनं दिली उत्तरं