Shah Rukh Khan attends Ira Khan Reception: बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि आमिर खान (Aamir Khan
) यांच्यातील वादाची चर्चा एकेकाळी सुरु होती. 90 च्या दशकापासून या दोन स्टार्समध्ये स्पर्धा होती, असं म्हटलं जात होतं. त्यांच्यातील वादांची चर्चा आजही अनेकजण करतात. पण आता दोघांमधील वाद संपला आहे, असं म्हणता येईल कारण आमिर खानची मुलगी आयरा खानच्या (Ira Khan) रिसेप्शन सोहळ्याला शाहरुखनं त्याच्या पत्नीसह हजेरी लावली.


आमिरच्या लेकीच्या रिसेप्शनला किंग खानची हजेरी (Shah Rukh Khan attends Ira Khan Reception)


शाहरुख खानने आमिर खानची मुलगी आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या रिसेप्शन सोहळ्याला लावली होती. रिसेप्शन सोहळ्यातील शाहरुख आणि गौरी यांचे फोटो सोशल मीडियावर येताच व्हायरल झाले. यादरम्यान सुपरस्टार आमिर खान आणि शाहरुख खान यांनी एकमेकांशी संवाद साधला. 






 आमिरनं त्याच्या कुत्र्याचं नाव ठेवलं 'शाहरुख'?


आमिर खान आणि शाहरुख खान यांच्यात काही वर्षापूर्वी वाद झाला होता असं म्हटलं जातं. क काळ असा होता जेव्हा सुपरस्टार आमिर खानने आपल्या पाळीव कुत्र्याचे नाव 'शाहरुख' असं ठेवले होते. या घटनेने त्यावेळी प्रचंड खळबळ उडाली होती. आमिर खानने एका व्लॉगमध्ये लिहिले होते की, 'शाहरुख माझे पाय चाटत आहे आणि मी त्याला बिस्किटे खाऊ घालत आहे. आता मला यापेक्षा जास्त काही नको आहे.'


आमिरच्या या व्लॉगने अनेकांचे लक्ष वेधले. नंतर आमिर खानने या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले. तो म्हणाला, "शाहरुख आमच्या घरातील नोकराच्या कुत्र्याचे नाव आहे. जेव्हा मी हे घर विकत घेतले तेव्हा तो कुत्राही केअरटेकरसोबत आला होता. "


शाहरुख आणि आमिरचे चित्रपट


शाहरुखसाठी 2023 हे वर्ष खास ठरलं. पठाण, जवान आणि डंकी हे शाहरुखचे चित्रपट गेल्या वर्षी रिलीज झाले. त्याच्या या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता शाहरुखच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. तर आमिरचा  'लाहोर- 1947'   हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती  आमिर खान प्रॉडक्शन्स ही आमिरची प्रॉडक्शन कंपनी करणार आहे. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Ira khan And nupur shikhare Reception: मुख्यमंत्री शिंदेपासून ते ठाकरे कुटुंबीयांपर्यंंत; आमिरच्या लेकीच्या रिसेप्शनला या दिग्गजांनी लावली हजेरी