Radhika Apte:  अभिनेत्री राधिका आपटेचा (Radhika Apte) 'मेरी ख्रिसमस' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटामुळे सध्या राधिका चर्चेत आहे. राधिका ही सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करते. राधिकानं नुकताच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये राधिकानं तिला विमानतळावर आलेल्या अनुभवाबद्दल नेटकऱ्यांना सांगून संताप व्यक्त केला आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


राधिकाची पोस्ट


राधिका आपटेनं विमानतळाच्या  एयरोब्रिजमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये राधिका मास्क लावून बसलेली दिसत आहे. या फोटोला राधिकानं कॅप्शन दिलं,  "मला हे पोस्ट करावे लागले! आज सकाळी साडेआठ वाजता माझी फ्लाइट होती. आता 10:50 वाजले आहेत आणि फ्लाइट अजूनही बोर्ड झालेली नाही. पण तिथल्या लोकांनी सांगितले की आम्ही बोर्डिंग करत आहोत आणि त्यांनी सर्व प्रवाशांना एयरोब्रिजमध्ये बसवले आणि लॉक केले! लहान बाळे, वृद्धांसह इतर प्रवासी तासाभरापासून कोंडून आहेत. सिक्युरिटीनं दरवाजे उघडले नाहीत. कर्मचार्‍यांना या गोष्टीची काहीच माहिती नाही!  त्यांचा क्रू बोर्ड नव्हता झाला. क्रूमध्ये बदल झाला होता आणि ते अजूनही नवीन क्रूची वाट पाहत आहेत परंतु ते कधी येतील याची त्यांना कल्पना नाही त्यामुळे ते किती काळ आत लॉक केले जातील हे कोणालाही माहिती नाही. मी थोडक्यात तिथेन पळून  जाऊन  बाहेरील अत्यंत मूर्ख महिला कर्मचारीसोबत बोलले जी, 'जी काही समस्या नाही आणि उशीर झाला नाही', असं सांगत होती. आता मी मला आतल्या बाजूनं लॉक केलं. त्यांनी आम्हाला सांगितले की आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत येथे असू. सर्व लॉक इन आहेत. पाणी नाही टॉयलेट नाही. या मजेदार प्रवासाबद्दल धन्यवाद!!"






राधिकाच्या या पोस्टला नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेक नेटकऱ्यांनी या पोस्टला कमेंट करुन संताप व्यक्त केला आहे. 


सेक्रेड गेम्स, घूल आणि ओके कम्प्युटर यांसारख्या वेब सीरिजमधून राधिका प्रेक्षकांच्या भेटीस आली. तसेच पॅडमॅन, मोनिका ओ माय डार्लिंग, अंधाधूंद यांसारख्या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. राधिकाचा मेरी ख्रिसमस हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आहे.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Radhika Apte : बोल्ड आणि ब्युटिफूल... मराठमोळ्या राधिकाच्या दिलखेचक अदा