Rashmika Mandanna: अभिनेत्री रश्मिका मंदाना  (Rashmika Mandanna)  ही सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. रश्मिकाचा डीपफेक व्हिडिओ (Deepfake Video) व्हायरल झाला आहे. रश्मिकाच्या या व्हायरल व्हिडीओचा ओरिजनल व्हिडीओ ज्या सोशल मीडिया इन्फ्लुएंसरवर शूट झाला आहे ती  झारा पटेल पहिल्यांदाच या व्हिडीओबाबत बोलली आहे. झारा पटेलनं ( Zara Patel) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन डीपफेक व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.


झारा पटेलची पोस्ट


झारा पटेलनं इन्स्टाग्राम  “सर्वांना नमस्कार, माझ्या लक्षात आले आहे की कोणीतरी माझ्या शरीराचा आणि एका लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीचा चेहरा वापरून एक डीपफेक व्हिडिओ तयार केला आहे. डीपफेक व्हिडिओमध्ये माझा कोणताही सहभाग नव्हता आणि जे काही घडत आहे त्यामुळे मी खूप अस्वस्थ झाले आहे. "


"मला स्त्रिया आणि मुलींच्या भवितव्याची काळजी वाटते आहे. ज्यांना आता सोशल मीडियावर स्वतःला ठेवण्याची भीती वाटते. कृपया एक पाऊल मागे टाका आणि तुम्हाला इंटरनेटवर काय दिसते ते एकदा तपासा. इंटरनेटवरील सर्व काही खरे नाहीये. जे घडत आहे त्यामुळे मी खूप अस्वस्थ आहे." असंही झारानं पोस्टमध्ये लिहिलं. झारा पटेलच्या व्हायरल व्हिडीओमध्ये ती ब्लॅक कलरच्या  डीपनेक ड्रेसमध्ये दिसत आहे. या व्हिडीओवर रश्मिकाचा चेहरा एडिट करुन हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. 




डीपफेक  एआयचा वापर करुन सहज बनवले जातात. टॉम हँक्स, स्कारलेट जोहान्सन आणि क्रिस्टन बेल हे काही अभिनेते आहेत ज्यांचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झालेल्या डीपफेक व्हिडिओमध्ये वापरले गेले आहेत.




कलाकारांनी व्यक्त केला संताप


नागा चैतन्य, मृणाल ठाकूर आणि चिन्मयी श्रीपाद यांनी सोशल मीडियावर शेअर करुन रश्मिकाच्या डीपफेक व्हिडीओ प्रकरणाबाबत संताप व्यक्त केला आहे. अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन हा व्हिडीओ क्रिएट करणाऱ्यावर कायदेशीर करवाई करण्याची मागणी केली आहे.


 






रश्मिकाचे आगामी चित्रपट


रश्मिका ही 'द गर्लफ्रेंड' आणि अॅनिमल या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिकाचा अॅनिमल हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगु, तमिळ,  कन्नड आणि  मल्याळम या भाषांमध्ये रिलीज केला जाणार आहे.  या चित्रपटाची रश्मिकाचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Rashmika Mandanna: डीपफेक व्हिडीओ प्रकरण: नागा चैतन्य ते मृणाल ठाकूर, 'या' कलाकारांनी व्यक्त केला संताप, रश्मिकाला केला सपोर्ट