Rashmika Mandanna: अभिनेत्री  रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandanna) डीपफेक व्हिडिओ (Deepfake Video) व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन संताप व्यक्त केला. अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन हा व्हिडीओ क्रिएट करणाऱ्यावर कायदेशीर करवाई करण्याची मागणी केली आहे. अशातच आता इतर कलाकारांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन रश्मिकाला सपोर्ट केला आहे. 


नागा चैतन्यची पोस्ट


नागा चैतन्यने ट्वीटमध्ये लिहिलं, "तंत्रज्ञानाचा कसा दुरुपयोग केला जात आहे हे, पाहणे खरोखरच निराशाजनक आहे . भविष्यात हे कशी प्रगती करू शकते याचा विचार आणखी भयानक आहे. याला बळी पडणाऱ्या लोकांच्या संरक्षणासाठी कारवाई करावी लागेल. कोणत्यातरी कायद्याची अंमलबजावणी करावी लागेल. आम्ही तुला सपोर्ट करतो."






अभिनेत्री  मृणाल ठाकूरनं देखील इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, "अशा गोष्टी करणाऱ्यांची लाज वाटते, यावरून असे लक्षात येते की,  अशा लोकांमध्ये विवेकबुद्धीच उरलेली नाही. रश्मिका मंदाना या प्रकरणाबद्दल बोलल्याबद्दल धन्यवाद, हा मुद्दा हाताळल्याबद्दल मी तुझे आभार मानते. याची झलक आपण आतापर्यंत पाहिली आहे परंतु  बर्‍याच लोकांनी गप्प राहणे पसंत केले. दररोज इंटरनेटवर महिला कलाकारांचे मॉर्फ केलेले व्हिडिओ तसेच शरीराच्या एका भागावर झूम केलेले व्हिडीओ व्हायरल झालेले दिसत आहेत. समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत? तुम्ही "लाइमलाइट" मध्ये असणारी अभिनेत्री असू शकतो परंतु दिवसाच्या शेवटी आपल्यापैकी प्रत्येकजण माणूस असतो. आम्ही याबद्दल का बोलत नाही? गप्प बसू नका, आता वेळ नाही."




चिन्मयी श्रीपादनं देखील ट्विटरवर ट्वीट शेअर करुन रश्मिकाला सपोर्ट केला आहे. 






इतर महत्वाच्या बातम्या:


Rashmika Mandanna: "हेच शाळेत असताना झालं असतं तर...";'तो' व्हिडीओ पाहिल्यानंतर रश्मिका हबकली