Taapsee Pannu : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Tapsee Pannu) आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर मनावर अधिराज्य गाजवते. आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर तिने अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे. ओटीटी विश्वातदेखील तिने आपला दबदबा कायम ठेवला आहे. सिनेमांमुळे चर्चेत असलेली तापसी अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकते. आता पुन्हा एकदा तापसी पन्नू विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये (Indore) तापसी पन्नूविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तापसीवर सनातन धर्माची प्रतिमा दुखावल्याचा आरोप आहे. आता याप्रकरणी इंदूर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. छत्रीपुरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकलव्य गौर नामक व्यक्तीने तापसी पन्नू विरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्या व्यक्तीने तापसीने सनातन धर्माचा अपमान केल्याचं म्हटलं आहे."
नेमकं प्रकरण काय?
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने एका फॅशन शोमध्ये रॅम्पवॉक करताना खूप बोल्ड ड्रेस परिधान केला होता. तसेच तिने लक्ष्मी देवीचा फोटो असलेलं लॉकेटही घातलं होतं. तापसीच्या या वागणुकीमुळे सनातन धर्माच्या भावना दुखावल्या असून त्यांनी तापसी पन्नूविरोधात तक्रार दाखल केली आहे.
तापसी पन्नू सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यामातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. बॉलिवूड, राजकीय, सामाजिक अशा वेगवेगळ्या विषयांवर ती सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत असते. यामुळे तिला अनेकदा ट्रोल करण्यात येते. तापसी लवकरच बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'डंकी' (Dunki) या सिनेमात झळकणार आहे. तिचे चाहते आता या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
तापसी पन्नूबद्दल जाणून घ्या... (Who is Tapsee Pannu)
तापसी पन्नूने 2010 साली तेलुगू सिनेमाच्या माध्यमातून सिनेविश्वात पदार्पण केलं आहे. तर 2013 साली 'चश्मेबद्दूर' या सिनेमाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. पण शूजित सरकारच्या 'पिंक' या सिनेमामुळे तापसीच्या खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. तापसीने आजवर 'बेबी', 'नाम शबाना', 'सूरमा', 'द गाझी अटॅक', 'पिंक', 'मनमर्जियां', 'बदला', 'मुल्क', 'सांड की आँख','थप्पड' आणि 'शाब्बास मिथू' सारख्या अनेक लोकप्रिय सिनेमांत काम केलं आहे.
संबंधित बातम्या