Indias Richest Actor : बॉलिवूडचे अनेक कलाकार कोट्यवधींचे मालक आहे. एका जाहिरात आणि सिनेमासाठी ते चांगलच मानधन घेत असतात. बॉलिवूडकरांमध्ये नाव, फेम आणि पैसा अशा सर्वच गोष्टी आहेत. भारतातही अनेक श्रीमंत कलाकार आहेत. कोणाची नेटवर्थ 6000 कोटींच्या आसपास आहे तर कोणाची 3000 कोटींच्या. ही कलाकार मंडळी एका सिनेमासाठी 100-200 कोटी रुपयांचं मानधन घेत असतात. आज जाणून घ्या भारतातील सर्वात श्रीमंत (Indias Richest Actor) अभिनेत्याबद्दल...


भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता कोण? (Who is Indias Richest Actor)


भारतातील एक असा अभिनेता आहे ज्याने आजवर एकही हिट सिनेमा दिलेला नाही पण तरीही तो भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता आहे. भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्याचं नाव सरवानन अरुल (Saravanan Arul) असं आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षा त्याच्याकडे सर्वात जास्त कार आहेत. सरवानन अरुलला लेजेंड सरवानन म्हणूनही ओळखलं जातं. 


52 व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण केलेला अभिनेता


सरवाननने 2022 मध्ये 'द लेजेंड' या तामिळ सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. या सिनेमात उर्वशी रौतेलाही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा जोरदार आपटला होता. पण 2017 साली अभिनेता चर्चेत आला. लेकीच्या लग्नात त्याने 13 कोटी रुपयांचा आहेर दिला होता. याच कारणाने तो चर्चेत आला. त्यानंतर 2019 मध्ये ते पुन्हा एकदा चर्चेत आले. त्यावेळी त्याने एका जाहिरातीत तमन्ना भाटिया आणि हंसिका मोटवानीसोबत काम केलं होतं. 


भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता सरवानन अरुल


सरवानन हा 'द न्यू लेजेंड सरवानन स्टोर्स'चा मालक आहे. दक्षिण भारतात त्याची शॉपिंग कॉम्प्लेक्स चेन आहे. 2021-22 मध्ये याचं टर्नओवर 2500 कोटी रुपये होतं. मीडिया रिपोर्टनुसार, सरवाननकडे सलमान खान (Salman Khan), आमिर खान (Aamir Khan) आणि शाहरुख खानपेक्षा (Shah Rukh Khan) जास्त कार आहेत. दर महिन्याला तो 1.5 ते 2 कोटी रुपयांपर्यंत कमाई करतो. 


सरवानन अरुलच्या कार कलेक्शनबद्दल जाणून घ्या... (Saravanan Arul Car Collection)


सरवानन अरुलला गाड्यांची प्रचंड आवड आहे. त्याच्याकडे अनेक महागड्या आलिशान गाड्या आहेत. त्याच्याकडे रोल्स रॉयस ही कार आहे. तसेच Lamborghini Huracan, फेरारी 488, बेंटली कॉन्टिनेंटल जीटी, एस्टॉप मार्टिन डीबी 11, लैम्बोर्गिनी Urus, Bentley Flying Spur और  Porsche 911 Turbo S सारख्या कारचा समावेश आहे. 


संबंधित बातम्या


Amitabh Bachchan : "तुम्ही कधी भांडी घासली आहेत का?"; स्पर्धकाचा बिग बींना प्रश्न; उत्तर देत अमिताभ बच्चन म्हणाले,"किचनपासून बाथरुमपर्यंत सर्व साफ करतो"