मुंबई : मराठमोळा दिग्दर्शक अमित मसुरकरचा 'न्यूटन' हा सिनेमा ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. परदेशी चित्रपटाच्या कॅटेगरीत या चित्रपटाला नामांकन मिळालं होतं. राजकुमार रावची चित्रपटात मुख्य भूमिका आहे.
ऑस्करने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर 9 चित्रपटांची नावं जाहीर केली आहेत, ज्यांनी अकॅडमी पुरस्कारांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. या यादीत 'अ फॅनटॅस्टिक वुमन', 'इन द फेड', 'ऑन बॉडी अँड सोल', 'फॉक्सट्राट', 'द इनसल्ट' , 'लवलेस', 'द वुंड', 'फेलिसिटे', 'द स्क्वायर' यांचा समावेश आहे.
'द अकॅडमी'च्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, '#Oscars90 news:परदेशी भाषा पुरस्कारांच्या यादीत या नऊ सिनेमांचा समावेश आहे. तुम्ही यातले किती चित्रपट पाहिले?'
https://twitter.com/TheAcademy/status/941479081513689088
न्यूटन सिनेमात राजकुमार राव मुख्य भूमिकेत असून मराठमोळ्या अमित मसुरकरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. छत्तीसगडच्या नक्षलवादी परिसरात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याची ही कहाणी असून, यात राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यात आलं आहे.
राजकुमारने यात न्यूटन कुमारची भूमिका साकारली आहे. राजकुमारसह पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा, अंजली पाटील, रघुबीर यादव यांच्याही मुख्य भूमिका आहे.
संबंधित बातम्या
मराठमोळ्या अमित मसुरकरचा 'न्यूटन' ऑस्करच्या शर्यतीत
‘न्यूटन’ इराणी सिनेमाची कॉपी?, दिग्दर्शक अमित मसुरकरांनी मौन सोडलं!
न्यूटन हा 'या' अभिनेत्याचा ऑस्करवारी करणारा आठवा चित्रपट
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारताला झटका, अमित मसुरकरचा 'न्यूटन' ऑस्करमधून बाद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Dec 2017 02:35 PM (IST)
न्यूटन सिनेमात राजकुमार राव मुख्य भूमिकेत असून मराठमोळ्या अमित मसुरकरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -