Kiran Mane : छोट्या पडद्यावरील  मुलगी झाली हो (Mulgi Jhali Ho) या मालिकेला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. या मालिकेत अभिनेता किरण माने (Kiran Mane) हे विलास पाटील ही भूमिका साकारत होते. किरण हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. सध्या ते त्यांच्या राजकीय भूमिका सोशल मीडियावर मांडत आहेत. किरण यांना मुलगी झाली हो या मालिकेतून काढण्यात आलं आहे. किरण यांचा आरोप आहे की, राजकीय भूमिका मांडल्यामुळे त्यांना मालिकेतून बाहेर काढण्यात आलं आहे. यासंदर्भात आता किरण माने यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे. 


किरण माने यांनी नुकतीच  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे भेट घेतली यावेळी किरण यांना अचानक मालिकेतून काढून टाकल्या बाबत   चर्चा झाली. विशिष्ट पक्षाविरोधात लिहिल्यामुळे काढून टाकल्याचा किरण माने यांचा आरोप आहे. 


शरद पवार आणि किरण मांने यांच्यात झालेल्या चर्चेतबद्दल किरण माने यांनी सांगितले आहे. त्यांनी सांगितले,  माझी बाजू मी शरद पवार यांच्या समोर मांडली आहे. माझ्यावर जो अनन्या झाला आहे याबाबत शरद पवार यांच्याशी बोलायला हवं असं मला वाटलं म्ह्णून मी आज येऊन भेट घेतली कारण माझ्यावर ज्याप्रकारे अन्याय झाला आहे तो सांस्कृतिक दहशतवादाचं उदाहरण आहे.' पुढे ते म्हणाले,  या विषयी भाजप मधील वरिष्ठांशी मी बोलणार आहे उदयनराजे भोसले यांच्याशी संपर्क साधला परंतु ते गोव्यात आहेत म्ह्णून बोलणं होऊ शकलं नाही आज ते येतील उद्या आमची भेट होणार आहे. आता चेंडू स्टार प्रवाहाच्या कोर्टात आहे माझ्यावर एका महिलेने आरोप केले असं त्यांचं म्हणणं आहे मग गुन्हा दाखल करावा चॅनलने अजून का केला नाही. शरद पवार यांनी माझी बाजू सविस्तरपणे ऐकून घेतली जवळपास दीड तास चर्चा झाली सध्या त्यांनी यावर काही प्रतिक्रिया दिली नाही. मला आशा आहे मला न्याय मिळेल. स्टार प्रवाहने एकदा स्पष्ट केलं की मी देखील पुढं काय करायचं याबाबत निर्णय घेईल. कलाकारावर अनन्या होत असेल राज्यात देखील मराठी चित्रपट महामंडळ आहे त्यांच्याकडे देखील आम्ही जाऊ'


मालिकेतून काढून टाकल्यानंतर  किरण यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, ' काट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा... गाड़ दो, बीज हूँ मैं, पेड़ बन ही जाऊंगा !' किरण माने यांच्या अनेक चाहत्यांनी आयस्टँड व्हिथ किरण माने असा हॅशटॅग वापरून किरण माने यांना पाठिंबा दर्शवला आहे.


जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad ) यांनी देखील ट्वीट शेअर केले होते. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले होते,  'स्टार प्रवाहावरील “मुलगी झाली हो” या मालिकेतील विलास पाटील पात्र साकारणा-या किरण माने या अभिनेत्यास फुले, शाहु, आंबेडकर विचारांची कास धरुन सोशल मिडीयावर लिहीतो, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांबद्दल प्रश्न विचारतो म्हणुन अचानक मालिकेतुल काढुन टाकले गेले.'


महत्त्वाच्या बातम्या : 


Kiran Mane : राजकीय भूमिका घेतल्यानं किरण मानेंना 'मुलगी झाली हो' मालिकेतून काढलं!सोशल मीडियावर चाहते आक्रमक


Exclusive : 'सलमानला चावलेल्या सापाला...'; सलीम खान यांची माहिती


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha