Champaran Mutton:  'चंपारण मटण' (Champaran Mutton) या शॉर्ट फिल्मने स्टुडंट अकादमी पुरस्काराच्या (Student Academy Awards) उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.  स्टुडंट अकादमी पुरस्काराला विद्यार्थांचा ऑस्कर देखील म्हटलं जातं. पुण्यातील प्रतिष्ठित फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) मधील प्रतिभावान चित्रपट निर्माते रंजन कुमार यांनी दिग्दर्शित केलेला हा लघुपट स्टुडंट अकादमी पुरस्काराच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. जाणून घेऊयात 'चंपारण मटण' या शॉर्ट फिल्मबद्दल...


'चंपारण मटण' या शॉर्ट फिल्मचे सिनेमॅटोग्राफर आदिथ सत्वीं हे आहेत. तर या लघुपटाची एडिटर वैष्णवी कृष्णन आहे.  या शॉर्ट फिल्मचा साऊंड डिझायनर शुभम घाटगे हा आहे. 'चंपारण मटण' या  शॉर्ट फिल्ममध्ये प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री फलक खानने ANI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये या शॉर्ट फिल्मची माहिती दिली आहे. तिनं या मुलाखतीमध्ये या लघुपटाच्या संपूर्ण टीमचे आभार मानले.


काय म्हणाली फलक खान?


फलक खाननं ANI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं, "मी या यशाबद्दल संपूर्ण टीमची आभारी आहे. सर्वांनी केलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. 'चंपारण मटण' ही कथा एका तरुणाची आहे, जो लॉकडाऊनच्या काळात बेकार होतो."


'चंपारण मटण' हा लघुपट मध्यमवर्गीय कुटुंबांना तोंड देत असलेल्या संघर्षांची माहिती देतो आणि त्यांना सहन कराव्या लागणाऱ्या रोजच्या समस्या दाखवतो."असंही फलकनं मुलाखतीमध्ये सांगितलं.


फलक खाननं शेअर केली पोस्ट


फलक खाननं 'चंपारण मटण' ही शॉर्ट फिल्मची निवड  स्टुडंट अकादमी पुरस्काराच्या उपांत्य फेरीत झाल्यानंतर सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली होती. फलक खाननं  या पोस्टला कॅप्शन दिलं, "चंपारण मटण - हा केवळ एक लघुपट नसून ती एक भावना आहे आणि आपण सर्वांनी खूप उत्कटतेने हा चित्रपट बनवला आहे.  माझ्या 'चंपारण मटण' च्या संपूर्ण टीमचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल मी आभार मानू इच्छितो."  






फलक खाननं  शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ऑस्करचा विद्यार्थी अकादमी पुरस्कार हा चित्रपटसृष्टीतील  प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. जगभरातील विविध चित्रपट प्रशिक्षण संस्थांमधील  स्पर्धक स्पर्धेमध्ये सहभाही होतात.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :


Oscars 2023 : ए. आर. रहमान ते सत्यजीत रे; 'या' भारतीय कलाकारांनी ऑस्करवर कोरलं नाव