Sunny Deol Video: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सनी देओल  (Sunny Deol)  सध्या त्याच्या गदर-2 (Gadar 2) या चित्रपटामुळे चर्चेत आहे.  गदर 2 हा चित्रपट आज (11 ऑगस्ट) चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट बघत होते. गदर 2 चित्रपटामध्ये सनीसोबत अभिनेत्री अमिषा पटेल  (Ameesha Patel) आणि उत्कर्ष शर्मा यांनी प्रमुख भूमिका साकरली आहे. नुकताच गदर 2 मधील अभिनेता सनी देओलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो एका चाहत्यावर भडकलेला दिसत आहे.


अभिनेता सनी देओल (Sunny Deol)  हा नेहमीच हसताना दिसतो. तसेच तो कधी कधी भावूक झालेला देखील दिसतो. पण चाहत्यांनी त्याला रागवताना पाहिलं  आहे. सनीचा एक सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसते की, सनीचा एक चाहता त्याच्याकडे सेल्फी घेण्यासाठी धावत येतो. सनीचा एक अंगरक्षक त्या चाहत्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण कसा तरी तो सनीपर्यंत  पोहोचतो. जेव्हा तो सेल्फी काढतो तेव्हा सनी देओल त्याच्यावर ओरडतो.


व्हायरल व्हिडीओला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी सनी देओलला ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्यानं व्हायरल व्हिडीओला कमेंट केली,सर, 'आम्ही तुमचा आदर करतो, पण तुम्ही चुकीच्या पद्धतीनं जनतेसोबत वागलात तर ते बरे दिसत नाही.'


पाहा व्हिडीओ:






अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर 2' हा 2001 मध्ये आलेल्या 'गदर एक प्रेम कथा' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. यामध्ये सनी देओलने तारा सिंहची भूमिका साकारली तर अमिषा पटेलने सकिनाची भूमिका साकारली. या चित्रपटाचं अनेक लोक सोशल मीडियावर कौतुक करत आहेत. गदर 2 आणि ओएमजी-2 या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली आहे. कोणता चित्रपट पहिल्या दिवशी जास्त कमाई करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.


'गदर 2' (Gadar 2) या चित्रपटात तारा सिंह आणि सकिना यांची लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. तसेच तारा सिंहचं त्याच्या मुलावर असणारे प्रेम देखील दाखवण्यात आलं आहे.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :


Gadar 2 Twitter Review: कुणी म्हणतंय "ब्लॉकबस्टर" तर कुणी म्हणतंय "टाईमपास"; गदर-2 पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी शेअर केला रिव्ह्यू