Sridevi Birth Anniversary:  आपल्या अभिनयानं आणि नृत्यानं ज्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली अशा दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांचा चाहात वर्ग मोठा आहे. श्रीदेवी यांचा जन्म 13 ऑगस्ट 1963 रोजी झाला. 'बॉलिवूडची चांदनी' अशी श्रीदेवी यांची ओळख होती. प्रेक्षक श्रीदेवी यांचे चित्रपट आजही आवडीनं बघतात.  जाणून घेऊयात श्रीदेवी यांच्या IMDb वर सर्वाधिक रेटिंग असणाऱ्या चित्रपटांबद्दल...


IMDb वर सर्वाधिक रेटिंग असणारे श्रीदेवी यांचे चित्रपट



  • मूंद्रम पिराई - 8.6

  • ओलावू गेलुवू - 8.4

  • सदमा - 8.3

  • वरुमायिन निरम सिगप्पू- 8.3

  • जगदेका वीरुदु अथिलोका सुंदरी - 8.1

  • क्षण क्षणम- 8.1

  • पदाहरेल्ला वायासू - 8.1

  • पाथिनारु वयथिनिले - 8.0

  • इंग्लिश विंग्लिश - 7.8


श्रीदेवी यांचे खरे नाव ‘श्री अम्मा यंगर अय्यपन’ आहे.  दिवंगत अभिनेत्री  श्रीदेवी यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी बालकलाकार म्हणून 'कंधन करुणाई' या तमिळ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.  त्यानंतर त्यांनी हिंदी, मल्याळम, तेलुगू आणि कन्नडासह अनेक भाषांमधील 300 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. 1979मध्ये आलेल्या 'सोलहवा सावन' या चित्रपटातून श्रीदेवीने मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. श्रीदेवीला खरी ओळख ‘हिम्मतवाला’ या चित्रपटातून मिळाली होती. या चित्रपटात श्रीदेवी अभिनेता जितेंद्रसोबत मुख्य भूमिकेत झळकली होती.


 2013 मध्ये त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. श्रीदेवी यांच्या हिम्मतवाला,  मून्द्रम पिरई, मिस्टर इंडिया, चांदनी, इंग्लिश विंग्लिश, मॉम  या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. त्यांचा मॉम हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामधील श्रीदेवी यांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं होते. श्रीदेवी यांनी 24 फेब्रुवारी 2018 रोजी जगाचा निरोप घेतला.श्रीदेवी यांच्या निधनानं बॉलिवूडवर शोककळा पसरली होती.


श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लव्हस्टोरी


'मिस्टर इंडिया' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान श्रीदेवी आणि बोनी कपूर (Boney Kapoor) यांची मैत्री झाली. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. बोनी कपूर यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि श्रीदेवींसोबत लग्न केलं.  1996 मध्ये श्रीदेवी आणि बोनी कपूर  यांनी लग्नगाठ बांधली.  






महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Sridevi Death Anniversary : बॉलिवूडची 'चांदनी'! कोट्यवधी मानधन घेणाऱ्या बॉलिवूडच्या पहिल्या अभिनेत्री, जाणून घ्या वयाच्या चौथ्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या श्रीदेवींबद्दल...