मुंबई : बलात्काराच्या खटल्यात अडकवलेल्या पतीचा मृत्यू झाला असला, तरी त्याला निर्दोष सिद्ध करण्याचा ध्यास तिने घेतला आहे. ती म्हणजे बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेता इंद्रकुमारची पत्नी पल्लवी कुमार.
27 जुलै 2017 रोजी इंद्रकुमारचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. वयाच्या अवघ्या 44 व्या वर्षी इंद्रकुमारला आलेल्या
अपमृत्यूने बॉलिवूडसह चाहतेही हळहळले. महिन्याभराच्या कालावधीत इंद्रकुमारची जीवनशैली, त्याने घेतलेले निर्णय, त्याला आलेलं नैराश्य आणि त्याचा आरोग्यावर झालेला परीणाम.. अशा सर्व गोष्टींवर चर्चा झाली.
ड्रग्ज आणि दारुच्या व्यसनामुळे इंद्रकुमारचं टॅलेंट वाया गेलं, असा दावा दीर्घकाळ त्याची प्रेयसी राहिलेली अभिनेत्री इशा कोप्पीकरने केला होता. मात्र त्याच्याविषयी वाईट-साईट बोलणाऱ्यांची तोंडं त्याची दुसरी पत्नी पल्लवी कुमारने गप्प केली.
बलात्काराचा आरोप हेच इंद्रकुमारच्या नैराश्याचं कारण असल्याचा दावा पल्लवीने केला आहे. 25 वर्षांच्या मॉडेलने 2014 मध्ये त्याच्यावर बलात्कार आणि तीन दिवस मारहाणीचा आरोप केला होता. बॉलिवूडमध्ये संधी देण्याच्या आमिषाने त्याने आपला गैरवापर केल्याचा आरोप मॉडेलने केल्याचं पल्लवी म्हणाली.
काम न मिळणं आणि त्यामुळे आर्थिक आलेलं अस्थैर्य ही कारणं तर आहेतच. पण बलात्काराचा आरोप त्याच्या मनात सलत राहिला, असं 'स्पॉटबॉय'ला दिलेल्या मुलाखतीत पल्लवी म्हणाली. अशा भयंकर गुन्ह्याचे आरोप करुन तुम्हाला तुरुंगात टाकलं, तर त्याचा ताण तुमच्यावर येणारच. त्यातही तुम्ही जेव्हा सेलिब्रेटी असता, अख्खं जग तुम्हाला ओळखत असतं, तेव्हा तर प्रश्नच वेगळा. प्रत्येक सुनावणीला जाताना त्याला प्रचंड मनस्ताप झाल्याचं ती सांगते.
जेव्हा बलात्कार खटल्यातील दोषीचा मृत्यू होतो, तेव्हा ते प्रकरण निकालात निघतं. इंदर कुमारच्या केसबाबतची हाच प्रकार घडला. मात्र पल्लवीने कोर्टात याचिका करुन ही केस सुरु ठेवण्याची विनंती केली. 'मला माहित आहे की इंद्र निर्दोष आहे. त्याच्याकडून पैसे उकळण्यासाठी आणि त्याच्या प्रसिद्धीचा गैरवापर करण्यासाठी खोटे आरोप लावले आहेत. म्हणून मी कोर्टात याचिका दाखल करुन केस सुरुच ठेवण्यास सांगितलं'
'आम्ही केस जिंकू याची खात्री आहे. खरं तर इंद्रसाठी चांगल्या वकिलांची नियुक्ती केली आहे. मात्र निर्दोष सिद्ध
होण्यापूर्वीच त्याला मृत्यूने गाठलं' असं पल्लवी म्हणते. धादांत खोटे आरोप करणाऱ्या त्या मॉडेलला शिक्षा झालीच पाहिजे, असं पल्लवी म्हणते.
'मृत्यूनंतरही इंद्रकुमारला बलात्कार प्रकरणातून निर्दोष सोडवायचंय'
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Sep 2017 01:51 PM (IST)
काम न मिळणं आणि त्यामुळे आर्थिक आलेलं अस्थैर्य ही कारणं तर आहेतच. पण बलात्काराचा आरोप त्याच्या मनात सलत राहिला, असं बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेता इंद्रकुमारची पत्नी पल्लवी कुमार म्हणाली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -