Independence Day 2023 Movies : 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले (Independence Day 2023) असून यंदा देशात 77 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जात आहे. बॉलिवूडमध्येही देशभक्तीवर आधारित अनेक सिनेमांची निर्मिती करण्यात आली आहे. यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त 'शेरशाह' ते 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक' हे सिनेमे नक्की पाहा...
1. गदर 2 (Gadar 2) :
भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीवर आधारित 'गदर' हा सिनेमा चांगलाच गाजला. आता या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदा 15 ऑगस्ट निमित्त सिनेप्रेमी 'गदर 2' हा सिनेमा पाहू शकतात.
2. शेरशाह (Shershaah) :
स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभक्तीवर आधारित सिनेमा पाहायचा असेल तर 'शेरशाह' हा सिनेमा नक्की पाहा. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा कारगिल युद्धावर आधारित आहे. कारगिलमध्ये शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांचा हा बायोपिक आहे.
3. भुज: द प्राइड ऑफ इंडिया (Bhuj) :
अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या 'भुज : द प्राइड ऑफ इंडिया' या सिनेमात 1971 च्या भारत-पाक युद्धाचे चित्रण करण्यात आले आहे.
4. गुंजन सक्सेना (Gunjan Saxena) :
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरची मुख्य भूमिका असलेला 'गुंजन सक्सेना' हा सिनेमा वैमानिक गुंजन सक्सेना यांच्या आयुष्यावर आधारित आहे. कारगिल युद्धातील त्यांचे शौर्य आजही स्मरणात आहे. हा सिनेमा भारतीय सिनेप्रेमी स्वातंत्र्यदिनी पाहू शकतात. या सिनेमात पंकज त्रिपाठीने जान्हवी कपूरच्या वडिलांची भूमिका साकारली आहे.
5. उरी: द सर्जिकल स्ट्राइक (Uri: The Surgical Strike) :
'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' हा सिनेमा 2016 मध्ये भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित सिनेमा आहे. विकी कौशल या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे.
6. चक दे इंडिया (Chak De India) :
भारतीय महिला हॉकी संघावर आधारित 'चक दे इंडिया' हा सिनेमा आहे. एखादी इच्छा, सांघिक कामगिरी आणि चांगला प्रशिक्षक व त्याचे योगदान एखाद्या संघामध्ये किती बदल घडवू शकते, हे या सिनेमात मांडण्यात आले आहे.
7. रंग दे बसंती (Rang De Basanti) :
देशभक्तीवर आधारित असलेला 'रंग दे बसंती' हा एक चांगला सिनेमा आहे. सिनेमा देशभक्तीवर आधारित असण्यासोबत मनाला भिडणारा आहे. स्वातंत्र्यदिनी चांगले चित्रपट पाहणाऱ्या सर्व देशभक्तांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.
8. द लीजेंड ऑफ भगत सिंह (The Legend Of Bhagat Singh) :
राजकुमार संतोषी यांनी 'द लीजेंड ऑफ भगत सिंह' या सिनेमात भगत सिंह यांची गोष्ट उत्तरित्या चित्रीत केली आहे. हा सिनेमा पाहताना प्रेक्षकांच्या अंगावर नक्कीच शहारे येतील.
9. लगान (Lagaan) :
आशुतोष गोवारीकरचा 'लगान' हा सिनेमा प्रत्येक क्रिकेटप्रेमीची पहिली पसंती राहिला आहे. या सिनेमातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत.
10. बॉर्डर (Border) :
15 ऑगस्टला 'बॉर्डर' हा सिनेमा नक्की पाहा. देशप्रेमावर आधारित असलेला हा सिनेमा 1997 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. भारत आणि पाकिस्तान या दोन देशात 1971 मध्ये झालेल्या लढाईवर बेतलेला हा सिनेमा आहे.
संबंधित बातम्या