Gadar 2 OMG 2 Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दरम्यान अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'ओएमजी 2' (OMG 2) हा सिनेमाही प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर हे दोन्ही सिनेमे आमने-सामने आहेत. 


'गदर 2' आणि 'ओएमजी 2' या दोन्ही सिनेमांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता सिनेमा प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांची पाऊले सिनेमागृहाकडे वळाली आहेत. दोन्ही सिनेमांचाा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी कमाईच्या बाबतीत 'गदर 2'ने चांगली कमाई केली आहे.


'गदर 2', 'ओएमजी 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Gadar 2 OMG 2 Box Office Collection Day 1)


सनी देओल (Sunny Deol) आणि अमिषा पटेल (Ameesha Patel) स्टारर 'गदर 2' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी (Opning Day) चांगली कमाई केली आहे. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, 'गदर 2' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 35 कोटींची कमाई केली आहे. तर दुसरीकडे खिलाडी कुमारच्या 'ओएमजी 2'ने ओपनिंग डेला फक्त 10 कोटींची कमाई केली आहे.


'गदर 2' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा अनिल शर्माने (Anil Sharma) सांभाळली आहे. या सिनेमात सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा मुख्य भूमिकेत आहेत. 'गदर 2'मधील तारा सिंह आणि सकिनाची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तसेच 'ओएमजी 2' या सिनेमाच्या कथानकाचंही कौतुक होत आहे. दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. वीकेंडला हे सिनेमे आणखी कमाई करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.


सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा 'गदर' हा सिनेमा 2001 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता 22 वर्षांनंतर या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'गदर 2'चं कथानक तारा सिंह आणि त्याचा मुलगा चरणजीत सिंह यांच्याभोवती फिरणारं आहे. तर दुसरीकडे खिलाडी कुमारच्या 'ओएमजी 2'  सिनेमाचं कथानक शिवभक्त कांती शरण मुदगल म्हणजे पंकज त्रिपाठीभोवती (Pankaj Tripathi) फिरणारं आहे. 


'ओह माय गॉड 2' हा सिनेमाला सर्टिफिकेट देण्यास बोर्डाने आधी नकार दिला होता. पुढे कमिटीने निर्मात्यांनी 20 कट्स सुचवले. तसेच लैंगिक शिक्षणाचा मुद्दा आल्याने आणि  सिनेमातील काही दृश्यांमुळे 'ओह माय गॉड 2' या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने A सर्टिफिकेट म्हणजेच अडल्ट सर्टिफिकेट दिलं आहे. त्यामुळे आता हा सिनेमा फक्त प्रौढांनाच पाहता येणार आहे. 


संबंधित बातम्या


Gadar 2 Leaked Online : 'गदर 2' रिलीज होताच ऑनलाइन लीक; सनी देओलसह निर्मात्यांना बसला मोठा धक्का