Jab We Met Sequal: अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि अभिनेत्री करीना कपूर  (Kareena Kapoor) यांचा जब वी मेट (Jab We Met) हा चित्रपट आजही प्रेक्षक आवडीनं बघतात. या चित्रपटामधील गीत आणि आदित्य यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटामधील गाणी, डायलॉग्स देखील प्रेक्षकांना आवडले.  जब वी मेट या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरु होती. आता या चर्चेवर चित्रपटाचा दिग्दर्शक इम्तियाज अलीनं मौन सोडलं आहे.


काय म्हणाला इम्तियाज अली?


एका मुलाखतीमध्ये इम्तियाज अलीला जब वी मेट या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देत इम्तियाज अली म्हणाला, "नाही, मी याबाबत विचार केला नाही. जब वी मेट 2 ची स्टोरी माझ्याकडे अजून नाहीये. मी जब वी मेट 2 या चित्रपटाबद्दलचे काही आर्टिकल वाचले आहेत. ते प्रकाशित करण्यापूर्वी मला कोणीही विचारले नाही, त्यामुळे मला काय बोलावे ते कळत नाही. पण काय होते ते बघूया."  


जब वी मेट हा चित्रपट 2007मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटात शाहिद आणि करीना यांच्यासोबतच दारा सिंह,सौम्या टंडन, किरण जुनेजा, तरुण अरोरा या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली.






इम्तियाज अलीचा आगामी चित्रपट


इम्तियाज अली सध्या त्याच्या 'चमकिला' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात दिलजीत दोसांझ आणि परिणीती चोप्रा यांनी मुख्य भूमिका साकरली आहे. या चित्रपटाविषयी अपडेट्स देताना इम्तियाज म्हणाले की, 'हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मला आशा आहे की प्रेक्षकांना ते आवडेल.' रॉकस्टार, कॉकटेल, लव्ह आज कल,हायवे यांसारखे चित्रपटांचे दिग्दर्शन इम्तियाज अलीनं केलं आहे. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. 






ही बातमी वाचा:


'जब वी मेट'ची 'गीत' सापडली... करिनाच्या कार्बन कॉपीचा 'नगाडा' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल