Tiger Nageswara Rao Trailer Release: अभिनेता  रवी तेजाच्या (Ravi Teja) 'टायगर नागेश्वर राव' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. 'टायगर नागेश्वर राव' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रवीचे काही अॅक्शन सीन्स  पहायला मिळत आहेत. 'टायगर नागेश्वर राव'  चित्रपटाच्या ट्रेलरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


मुंबईमध्ये 'टायगर नागेश्वर राव' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच इव्हेंट पार पडला. टायगर नागेश्वर राव या चित्रपटाचा ट्रेलर पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये रिलीज करण्यात आला आहे. 'टायगर नागेश्वर राव' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये नुपूर सेन आणि रवी तेजा यांच्यातील रोमँटिक केमिस्ट्री दिसत आहे. तसेच या ट्रेलरमध्ये अनुपम खेर हे खास लूकमध्ये दिसत आहेत. 


कधी रिलीज होणार चित्रपट?


'टायगर नागेश्वर राव' हा चित्रपट 70 च्या दशकातील कथेवर आधारित आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन वामसी  यांनी केले आहे.  या चित्रपटाची निर्मिती मयंक सिंघानिया आणि अर्चना अग्रवाल यांनी केली आहे.  हा चित्रपट 20 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.


पाहा ट्रेलर






'टायगर नागेश्वर राव' ची स्टार कास्ट


'टायगर नागेश्वर राव' या चित्रपटात रवी तेजा,  नुपूर सेन  आणि अनुपम खेर यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. तसेच गायत्री भारद्वाज,रेणु देसाई,  जिशु सेनगुप्ता यांनी देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.


रवी तेजाचे चित्रपट


रवी तेजाने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यानं पुरी जगन्नाध दिग्दर्शित 'इटालु श्रावणी सुब्रमण्यम' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली. तसेच 'इडियट', 'वेंकी', 'ना ऑटोग्राफ' आणि 'क्रॅक' यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील त्यानं काम केलं.   चिरंजीवी  यांच्या 'वॉलटेर वीरय्या' या चित्रपटात देखील त्यानं काम केलं आहे. आता त्याच्या 'टायगर नागेश्वर राव'  या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 






वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Tiger Nageswara Rao : रवी तेजाच्या 'टायगर नागेश्वर राव' सिनेमाचा फर्स्ट लूक आऊट; पाच भाषेतील पाच सुपरस्टार सिनेमात झळकणार