Merry Christmas And Yodha: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra)  आणि अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) यांच्या योद्धा (Yodha) या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. करण जोहरनं (Karan Johar) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन योद्धा या चित्रपटाच्या रिलीज डेटची माहिती चाहत्यांना दिली आहे. योद्धा हा चित्रपट 8 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांच्या 'मेरी क्रिसमस' (Merry Christmas) या चित्रपटासोबत  बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे.


करण जोहरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन योद्धा या चित्रपटाच्या रिलीज डेटची माहिती दिली आहे. त्यानं पोस्टमध्ये लिहिलं, 'आम्ही सर्वजण 8  डिसेंबर 2023 रोजी सिनेमागृहात येण्यासाठी सज्ज झालो आहोत.' तसेच तरण आदर्शन यांनी मेरी क्रिसमस या चित्रपटाच्या रिलीज डेटची माहिती दिली आहे.  






श्रीराम राघवन यांनी मेरी क्रिसमस या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून सिद्धार्थच्या योद्धा या चित्रपटाचं दिग्दर्शन पुष्कर ओझा, सागर आंब्रे यांनी केले आहे. आता योद्धा आणि मेरी क्रिसमस या चित्रपटापैकी कोणता चित्रपट जास्त कमाई करेल? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 






अॅनिमल, डंकी, कॅप्टन मिलर आणि सालार हे चित्रपट देखील डिसेंबर महिन्यामध्ये रिलीज होणार आहेत. प्रेक्षक या आगामी चित्रपटांची  उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


सिद्धार्थ मल्होत्राचा योद्धा हा चित्रपट 15 डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. पण नंतर या चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली. आता 8 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. करण जोहर, शशांक खेतान, अपूर्व मेहता यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटामधील सिद्धार्थच्या लूकचा फोटो काही दिवसांपूर्वी करण जोहरनं सोशल मीडियावर शेअर केला होता.


संबंधित बातम्या:


Sunny Deol New Project: 'गदर 2' च्या यशानंतर सनी देओलच्या 'लाहोर- 1947' चित्रपटाची घोषणा; आमिर खान करणार निर्मिती